रेखाशी झाली रिया चक्रवर्तीची तुलना, पतीच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला म्हणलं जाऊ लागलं होतं ‘डायन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर ड्रग कनेक्शन प्रकरणात त्याची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला १४ दिवस तुरूंगात पाठवण्यात आले आहे. दरम्यान अनेक सेलिब्रेटी या अभिनेत्रीला पाठिंबाही देताना दिसत आहेत आणि माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत आता काही लोकांनी रिया चक्रवर्तीची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री रेखाच्या मीडिया ट्रायलशी केली आहे. चिन्मय श्रीपदाने ट्विटरवर रेखा आणि रियाची तुलना केली आहे.

गायक चिन्मय श्रीपदाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये रेखाच्या बायोग्राफीमधील काही भाग आहे. या पोस्टच्या माध्यमातून चिन्मय श्रीपादाने लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, जेव्हा १९९१ मध्ये रेखाचा पती मुकेश अग्रवालने आत्महत्या केली होती, तेव्हा रेखाला सर्वत्र कशा प्रकारे ‘डायन’ म्हटले जात होते. यासर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखाच्या बायोग्राफी मध्ये (रेखा: द अनटोल्ड स्टोरी) सांगितले गेले आहे की, रेखाला आपल्या पती मुकेश अग्रवालच्या आत्महत्येसाठी कशा प्रकारे दोषी ठरवले गेले.

तिला तिच्या सासरचे डायन म्हणायचे आणि इतकेच नाही तर बॉलिवूडचे तिचे सहकारीही तिच्याबद्दल बरेच काही बोलायचे. त्यात लिहिले आहे- ‘२ ऑक्टोबर १९९० रोजी मुकेश अग्रवाल रेखाच्या पतीने स्वत:चा जीव घेण्याचे ठरवले आणि खोलीतील पंख्याला ओढणी लावून गळफास लावून घेतला. तर मुकेशबाबत त्यांचा भाऊ अनिल म्हणाला होता की, तो दिवसभर खूप आनंदी होता.’

रेखाबद्दल मुकेश अग्रवाल यांचा भाऊ अनिल म्हणाले होते- ‘माझा भाऊ रेखावर खरे प्रेम करत होता. त्याच्यासाठी प्रेम म्हणजे करा किंवा मरा होते. रेखा त्याच्याबरोबर राहत होती, त्यांना ते सर्व सहन करणे शक्य नव्हते. आता त्यांना काय हवे आहे? तिला आता आपले पैसे हवे आहेत का?’ तर मुकेशच्या आईने रडत मीडियासमोर म्हटले होते – ‘त्या डायनने माझ्या मुलाला खाल्ले.’ त्यानंतर रेखाबाबत सगळीकडे विविध प्रकारच्या पोस्ट दिसू लागल्या.

सुभाष घई म्हणाले होते- “रेखाने फिल्म इंडस्ट्रीवर असा डाग लावला आहे की तो सहजपणे धुणे कठीण होईल. मला असे वाटते की, यानंतर कोणतेही आदरणीय कुटुंब कोणत्याही अभिनेत्रीला आपली सून म्हणून स्वीकारण्यापूर्वी दोनदा विचार करेल. कोणताही दिग्दर्शक तिच्याबरोबर पुन्हा काम करणार नाही. प्रेक्षक तिला भारतीय महिला किंवा न्यायाची देवी म्हणून कसे स्वीकारतील?”