ख्यातनाम प्रोडयुसर आणि दिग्दर्शक करण जोहरच्या वडिलांचे होते मिठाईचे दुकान अन् लाहोर ‘कनेक्शन’

मुंबई : वृत्तसंस्था – चित्रपट निर्माता करण जोहर आणि प्रोड्यूसर यश जोहर यांच्या चित्रपटांची विशेषता म्हणजे भव्य सेट आणि विदेशी लोकेशंस आहेत. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२९ मध्ये लाहोर येथे झाला. यश जोहर धर्मा प्रोडक्शनचे संस्थापक होते. त्यांनी ‘कल हो ना हो’, ‘कुछ कुछ होता है’ सारख्या सुपरहिट चित्रपटांना प्रोड्यूस केले आहे. २६ जून २००४ मध्ये ७४ वर्षाच्या वयामध्ये यश जोहर यांचे निधन झाले.

घराच्या वाटणीनंतर यश जोहरचा परिवार दिल्लीमध्ये स्थायिक झाला. इथे येऊन यश जोहरच्या वडिलांनी ‘नानकिंग स्वीट्स’ नावाने मिठाईचे दुकान सुरु केले. यश आपल्या ९ भावांमध्ये सगळ्यात मोठे आहे. त्यांचे जास्त शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना दुकानात काम करण्यास सांगितले. यामुळे ते हिशोब करु लागले. त्यांना काम करायला अजिबात पसंत नव्हते.

यश जोहर यांच्या आईने त्यांना खूप साथ दिली आणि म्हणाले की, ‘तु मुंबईमध्ये जा कारण तुझा जन्म दुकान सांभाळण्यासाठी झाला नाही.’ आईने यश यांना मुंबईला पाठविण्यासाठी घरातून दागिने आणि पैसे गायब केले. याचा संशय सिक्योरिटीवर आला होता. यासाठी त्याला मारहाण केली होती. आईने यश यांना मुंबई जाण्यासाठी असे काही केले होते.

यश मुंबईला तर पोहचले पण सुरुवातीला त्यांना खूप संघर्ष करावा लागला. ते टाइम्स ऑफ इंडिया पेपरमध्ये फोटोग्राफर बनण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी डायरेक्टर के. असिफ ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटाची शुटिंग करत होते. त्याच दरम्यान त्यांनी अभिनेत्री मधुबाला यांचा फोटो काढला होता. मधुबाला यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ती कोणाला फोटो काढू देत नव्हती.

यश त्यावेळी सुद्धा चांगली इंग्लिश बोलत होते. त्यांचे खूप शिक्षण झाले होते. यामुळे मधुबालाने इम्प्रेस होऊन फोटो काढण्याची यश यांना परवानगी दिली. त्यांनी मधुबालाचे फोटो काढल्यानंतर ऑफीसला गेले आणि त्यांना नोकरी मिळाली. यश जोहर खूपच धार्मिक होते. ते सकाळी उठून आंघोळ करुन ३ मिनिटे प्रार्थना करायचे. त्यांनी घरात एक छोटेसे मंदिर बनवले होते. कदाचित याची छाप त्यांच्या चित्रपटांवर पडली आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

मध ‘या’ ७ पदार्थांसोबत खाल्ल्यास आरोग्यासाठी घातक

तोंडाची स्वच्छता न राखल्यास वाढतो हार्ट अटॅकचा धोका

देशात मुलींची संख्या घटली, अखेर मानवी हक्क आयोगाकडून दखल

गरोदरपणातच स्ट्रेच मार्क्स होतात, हे चूकीचे ; जाणून घ्या सत्य