‘क्रिकेटर’ युवराज सिंगच्या वडिलांच्या वादग्रस्त भाषणावर डायरेक्टर विवेक रंजन अग्निहोत्री यांची कडक ‘अ‍ॅक्शन’ ! सिनेमातून केलं Out

पोलीसनामा ऑनलाइन –  टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटर युवराज सिंग (Yuvraj Singh) चे वडिल पंजाबी अ‍ॅक्टर योगराज सिंग (Yograj Singh) यांनी हिंदूंना गद्दार म्हणणारं एक स्टेटमेंट केलं होतं. वाद वाढल्यानंतर त्यांनी एका लाईव्ह शोदरम्यान माफीही मागितली. योगराज विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) चा सिनेमा द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) मध्ये काम करत आहेत. त्यांनी नवीन कृषी कायद्याला घेऊन सुरू असलेल्या आंदोलनात अतिशय निंदनीय, भडकावू आणि अपमानास्पद भाषण देऊन सर्वांच्याच भावना दुखावल्या. या प्रकरणी आता डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले, मी माझ्या द कश्मीर फाईल्स या सिनेमासाठी योगराज सिंह याना एका महत्त्वाच्या रोलसाठी कास्ट केलं होतं. त्यांच्या सोबत माझं दीर्घकाळ बोलणं झालं होतं. मला माहित आहे की, त्यांचा वादग्रस्त विधानं करण्याचा इतिहास आहे. परंतु मी याकडे दुर्लक्ष केलं. मी कलाकाराच्या राजकारणाला दूर ठेवतो. जेव्हा मला त्यांच्या भाषणाबद्दल समजलं तेव्हा मी चकित झालो. कुणीही महिलांबद्दल अशा प्रकारे बोलत असेल तर मी ते सहन करू शकत नाही.

पुढं ते म्हणाले, हे फक्त हिंदू महिला किंवा मुस्लिम महिलांबद्दल नाहीये, परंतु त्यांनी साधारणपणे महिलांबद्दल खूप वाईट विधान केलं आहे. माझ्या कश्मीर सिनेमात अल्पसंख्यंकांच्या बद्दल आहे. मी अशा व्यक्तीला नाही निवडू शकत जो समाजाला खास करून धर्माच्या आधारावर विभाजीत करण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्यांना एक समाप्ती पत्र पाठवलं आहे. आता ते माझ्या सिनेमाचा भाग नाहीत.