मुठा कालवा अचानक कसा फुटला ? : उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यात गुरुवारी मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणी शिरले. पुण्यातील खडकवासला धरणातून निघालेला मुठा नदीचा कालवा अचानक कसा फुटला ?  या दुर्घटनेमागची नेमकी काय कारणं आहेत ? याचा तपशीलवार अहवाल देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. तसेच हा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेत बेघर झालेल्यांचं अन्यत्र पुनर्वसन करा. त्यांना पुन्हा तिथेच घरं बांधून देऊ नका कारण भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा झाल्यास मोठी हानी होणार नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पीडित रहिवाशांसाठी तात्पुरता निवारा, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, शाळकरी मुलं, वृद्ध यांच्यासाठी उपाययोजना करा. गरज पडल्यास एनजीओंची मदत घ्या, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e965313-c8a4-11e8-a343-e766e288e98e’]

२७ सप्टेंबर रोजी घडलेल्या या दुर्घटनेत सुमारे ९८० जण बेघर झाले आहेत , अनेकांचे संसार वाहून गेले. या दुर्घटनेतील पीडितांना तीन कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली. एका कुटुंबाला ९५ हजारांपर्यंतची मदत रोख रकमेत दिली जाणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयत दिली.

ही मदत जाहीर करताना सार्वजनिक बांधकाम विभागानं इतर विभागांशी चर्चा केलीय का ? यातील किती बांधकामं बेकायदेशीर होती ? ही लोकं नेमकी कुठून आली आहेत, याचा काही अभ्यास केला का? असे प्रश्न न्यायालयाने राज्य सरकारला विचारले यावर नाही, असं उत्तर राज्य सरकारकडून देण्यात आलं. त्यामुळे यासंदर्भात मदतनिधीचं वाटप होण्याआधी या सर्व गोष्टींचा विचार करा असे निर्देश देत न्यायालयानं यासंदर्भात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तातडीनं बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत.

[amazon_link asins=’B071CP6K43,B00PQKR85E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b5ae9a0-c8a4-11e8-a2d6-b11090c2fea0′]

पुण्यातील सिंहगड रोडनजीक मुठा नदीचा कालवा फुटून झालेल्या या दुर्घटनेसंदर्भात अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे.

[amazon_link asins=’B00IRY9A6G,B017KLJBBU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’86401b5b-c8a4-11e8-b882-b1bbd4812e92′]