Bombay High Court | विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा विनयभंगच; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

ADV

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अकोला जिल्ह्यातील (Akola District) एका विनयभंगाच्या प्रकरणावर सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) एक महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले. विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे (Throwing love letters) किंवा शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंग असल्याचा महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयानेही (Bombay High Court) दोषी ठरवले आहे.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी कि, 2011 मध्ये एका 54 वर्षीय व्यक्तीवर अकोला येथील एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केला होता. पीडित महिलेने आरोपीने दिलेली एक चिठ्ठी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने ती चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असं तो तिला म्हणाला. कोणाला न सांगण्याची धमकी देखील दिली. या घटनेनंतर पीडितेने सिव्हिल लाइन्स पोलिसांमध्ये (Civil Lines Police) तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 2 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र आरोपीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

ADV

त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली.
त्यावेळी न्यायालयाने सांगितले की, ‘एखाद्या महिलेची अब्रू हा तिचा सगळ्या मोठा दागिना आहे.
त्यामुळे तिचा विनयभंग झाला की नाही हे ठरविण्यासाठी एखादे सरसकट समीकरण लागू करता येणार नाही.
विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे किंवा शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंग आहे असे सांगत आरोपीला दोषी ठरविले.

Web Title :- Bombay High Court | love letter throw on married women is crime says nagpur bench of mumbai high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीचा आणखी एक दणका, 4 कोटींची मालमत्ता जप्त

Pimpri Crime | पिंपरीत आढळला ब्रिटिश कालीन ‘बॉम्ब’, परिसरात खळबळ

MLA Abu Azmi | वाढदिवसानिमित्त काढली भव्य मिरवणूक; अबू आझमींसह अन्य कार्यकर्त्यांवर FIR दाखल