Coronavirus : फिल्म इंडस्ट्रीवर ‘कोरोना’चा ‘स्ट्राईक’, बॉक्स ऑफिसवर होतंय कोट्यावधीचं ‘नुकसान’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसची दहशत जगभर पसरताना दिसत आहे. चीनमध्ये जवळपास 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हजाराहून अधिक लोक कोरोनाचे शिकार झाले आहेत. कोरोनाचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे. कोरोनामुळं अनेक इंडस्ट्रीज आणि सेक्टर प्रभावित झाले आहेत. यात फिल्म इंडस्ट्रीचाही समावेश हे. जगभरात कोरोनामुळं सिनेजगताचं नुकसान होताना दिसत आहे.

सध्या ओव्हरसीज मार्केटकडून भारताच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होताना दिसत आहे. जर भारतातही कोरोनाची प्रकरण वाढताना दिसली तर डोमेस्टीक लेव्हलवर बॉक्स ऑफिसवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. भारतातील ओव्हरऑल बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 30 ते 40 टक्के भागिदारी इंटरनॅशनल मार्केटची असते.

गेल्या काही वर्षांमध्ये चीनमुळं भारतीय फिल्म इंडस्ट्रीला मोठा फायदा झाला आहे. भारताचे सिनेमे चीनमध्ये चांगली कमाई करत आहेत. परंतु कोरोना व्हायरसमुळं सध्या चीनमधील जवळपास 70 हजार थिएटर बंद आहेत. याचा सिनेमांच्या कलेक्शनवर मोठा परिणाम झाला आहे. इतकेच नाही तर यामुळे जुन्या रिलीज झालेल्या सिनेमांचं कलेक्शनही थांबलं आहे. इतर सिनेमेही रिलीज होत नाहीयेत.

2018 मध्ये चीन भारतीय फिल्म कंटेटसाठी इंटरनॅशनल मार्केट बनलं आहे. भारतीय सिनेमांच्या एकूण 1950 कोटींच्या व्यापारात चीनची हिस्सेदारी जास्त आहे. चीनमध्ये भारतीय सिनेमांची संख्याही वाढत आहे. 2016 साली चीनमध्ये 2 सिनेमे रिलीज झाले होते. 2018 मध्ये हा आकडा वाढून 10 झाला.