Breaking : NCB कडून इब्राहिम कासकर याच्यासह तिघे ताब्यात; 10 लाखाचं ड्रग्स जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एनसीबीच्या पथकानं अंधेरी परिसरातून इब्राहिम कासकर याला ताब्यात घेतलं आहे. कासकर आणि इतर दोघांना एनसीबीच्या पथकानं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पथकाने डोंगरी परिसरात अनेक ठिकाणी छापेमारी केली असून तब्बल 10 लाखाचे ड्रग्स जप्त केल्याचं सांगितलं जातंय.

परिसरात प्रचंड दहशत असलेल्या इब्राहिम कासकरच्या मुसक्या आवळण्यात एसीबीच्या पथकाला यश मिळालं आहे. दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या वडिलांचं नाव देखील इब्राहिम होतं. सध्या ते हयात नाहीत. मात्र, इब्राहिम कासकर हा आपण दाऊदचे बाप असल्याचं बोलत होता. एनसीबीच्या डोंगरी आणि इतर परिसरातील छापेमारीमुळं आणि इब्राहिम कासकरला ताब्यात घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. इब्राहिम कासकर याच्याकडून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.