Breast Cancer Symptoms | महिलांसाठी अलर्ट ! भारतात ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची प्रकरणे 50% वाढली, ‘या’ 7 लक्षणांवरून ओळखा; वेळेवर योग्य उपचारासाठी होईल मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Breast Cancer Symptoms | कॅन्सर एक अतिशय धोकादायक जीवघेणा आजार आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत, ज्यापैकी ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer Symptoms) एक आहे. जो महिलांमध्ये सर्वात जास्त होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (World Health Organization) नुसार, ब्रेस्ट कॅन्सरमुळे दरवर्षी 2.1 मिलियन महिला प्रभावित होतात. हेच महिलांमध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण सुद्धा आहे.

 

भारतात मागील तीन वर्षात मध्य वयोगटातील महिलांमध्ये (35-50 वर्ष वयोगट) ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये 50टक्के वाढ झाली आहे (In India, breast cancer has increased by 50 percent in women). हा अंदाज डॉक्टरांच्या ओपीडी नोंदीवर आधारित आहे.

 

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची कारणे (Causes of breast cancer in women)

स्तन कॅन्सरचे मुख्य कारण असते स्तनाच्या पेशींचे असामान्यपणे वाढणे. या पेशी निरोगी पेशींच्या तुलनेत जास्त वेगाने वेगळी गाठ तयार करतात.

या पेशी स्तनाद्वारे लिफ्म नोड्स किंवा शरीराच्या इतर भागात सुद्धा पसरू शकतात.

हार्मोनल, जीवनशैली आणि पर्यावरणीय कारकांमुळे स्तनाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे (Symptoms of breast cancer in women)

1) ब्रेस्टच्यावर त्वचेत सतत बदल होणे

2) निप्पल उलटे होणे

3) निप्पल किंवा हाडाची त्वचा खराब होणे

4) ब्रेस्टच्यावर लाल होणे

5) स्तनात गाठ किंवा कडक होणे

6) निप्पलमधून डिस्चार्ज होणे

7) स्तनाच्या आकारात बदल होणे

 

लक्षणे दिसल्यावर काय करावे/ कसा करावा बचाव
वरील लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. दारू कमी प्रमाणात प्या. नियमित व्यायाम करा. लठ्ठपणा टाळा. चांगला आहार घ्या.

 

Web Title :- Breast Cancer Symptoms | breast cancer symptoms in womens report claim 50 rise in breast cancer among middle aged women in india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mutual Fund | ‘या’ फंडने दिला 64.8% चा शानदार रिटर्न ! 10 हजाराची गुंतवणूक झाली 1.57 कोटी रुपयांची, जाणून घ्या सविस्तर

Chitra Wagh | ‘जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं’ – चित्रा वाघ

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 126 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी