‘या’ ४९ वर्षीय मॉडेलने २०० पेक्षा जास्त जणांशी डेटिंग करून केलं कुत्र्याशी लग्‍न (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सोशल मीडियावर एका हटके लग्नाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून त्याच्या व्हायरल होण्यामागे एक धक्कादायक कारण देखील आहे. ४९ वर्षीय माजी जलतरण सूट मॉडेल एलिझाबेथ होडने तिच्या कुत्र्याशी लग्न केले आहे. ज्याचे वय सहा वर्ष आहे. खास गोष्ट म्हणजे हे लग्न जगभरातील लोकांनी पाहिले होते. कारण ब्रिटनचा प्रसिद्ध टीव्ही शो ‘द मॉर्निंग’ ने या लग्नाचे थेट प्रक्षेपण केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार एलिझाबेथ हॉडचे अनेक सेलिब्रिटींशी संबंध राहिले आहेत. या खेरीज असे सांगितले जात आहे की, गेल्या काही वर्षात त्यांनी २०० हून अधिक लोकांसोबत डेटिंग केले आहे. पण त्यांचे खरे प्रेम त्यांना मिळाले नाही. यानंतर तिने आपल्या कुत्र्याला स्वतःचा मित्र बनविले.

मॉडेल एलिझाबेथचा २५ वर्षाचा मुलगा देखील आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आता त्यांना कोणत्याही पुरुषांची गरज नाही. आता ते त्यांचे संपूर्ण आयुष्य तिचा कुत्रा लोगन सोबत घालवतील. ‘द मॉर्निंग’ ने एलिझाबेथच्या लग्नाचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. जो आतापर्यंत ४,८६,००० लोकांनी पाहिलेला आहे. या व्यतिरिक्त पाच हजाराहून अधिक लाईक्स या व्हिडिओला आले असून १७०० हुन अधिक लोकांनी व्हिडिओ रिट्विट केला आहे.

http://bit.ly/2YFzLoW

आरोग्यविषयक वृत्त

You might also like