सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीत ‘या’ ब्रिटिश-पाक अभिनेत्याचं नाव; जाणून घ्या, कोण आणि काय आहे त्याचं UP ‘कनेक्शन’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – यंदा ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अवॉर्ड्स (बाफ्टा) च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नामांकनाच्या यादीत एका ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेत्याचं नाव घेतलं आहे. ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमद याला ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अवॉर्ड्स (बाफ्टा) च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या वर्गात नामांकित केले आहे. ‘साउंड ऑफ मेटल’ या चित्रपटासाठी त्याला नामांकन मिळालं आहे. 1982 मध्ये लंडनमध्ये जन्मलेला रिझ अहमदचे पालक पाकिस्तानी आहेत. असे असले तरी रिझ अहमदचे भारताशी खास नाते आहे.

ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमद शेरशाह मोहम्मद सुलेमानचा वंशज आहे. ब्रिटीश राज्यात अलाहाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्त झालेले ते पहिले मुस्लिम होते. शेरशाह मोहम्मद यांनी उर्दू कविता देखील लिहित होते. तसेच त्यांनी थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या थिअरी ऑन रिलेटिव्हिटी अर्थात सापेक्ष वादाच्या सिद्धांताबद्दल अनेक लेख देखील लिहिले आहेत. सन 1929 साली त्यांना त्या सर्वोत्कृष्ट कार्यकाळात किंग जॉर्ज कडून नाईट हि उपाधी देखील दिली गेली होती.

ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमदचे पालक 1970 च्या दशकात पाकिस्तानमधून ब्रिटनमध्ये गेले होते. ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमदने ऑक्सफोर्ड विद्यापीठातून फिलॉसॉफी अर्थात तत्त्वज्ञान, पॉलिटिक्स अर्थात राजकारण आणि अर्थशास्त्र (पीपीई)चा देखील अभ्यास केला आहे. ही प्रतिष्ठित पदवी असून ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमदच्या अगोदर ब्रिटनचे माजी पंतप्रधान हॅरोल्ड विल्सन आणि डेव्हिड कॅमेरून, नोबेल पारितोषिक विजेती मलाला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही ऑक्सफोर्डमधून याच पदवीसह शिक्षण घेतले आहे.

मायकेल विंटरबॉटमच्या ‘रोड टू ग्वांतानमो’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमदनं पदार्पण केलं आहे. पहिल्यांदाच 2010 मध्ये फिल्म फॉर लायन्स या चित्रपटात दिसला होता. याशिवाय मीरा नायरच्या ‘द रिलॅक्टंट फंडामेंलिस्ट’ या चित्रपटातही रिझ अहमदने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आपल्या या अभिनयाव्यतिरिक्त ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ आपल्या रॅपिंग आणि संगीत कारकीर्दीसाठी देखील ओळखला जात आहे.

मुगल मोगली चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमदने ट्विटरवर प्रश्नोत्तराच्या सत्रात सांगितले होते की, फिलिप सीमोर हॉफमॅन आणि दिवंगत अभिनेता इरफान खान यासारख्या कलाकारांकडून तो प्रेरणा घेत होता. फिलिप आणि इरफान दोघांनाही त्यांच्या उद्योगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी मानतो. 2014 मध्ये ड्रगच्या अति प्रमाणात सेवन केल्यामुळे फिलिपचा मृत्यू झाला होता तर, मागील वर्षी अभिनेता इरफान खानचा मृत्यू कर्करोग झाल्यामुळे झाला होता.

ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अवॉर्ड्स अर्थात बाफ्टाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नामांकत यादीत रिझ अहमदचे नाव आले आहे. त्यामुळे या ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेत्याविषयी अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता होती. या ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमदचे भारत देशाबरोबरही खास नातं होतं, कारण त्याचे वडील भारतात त्या काळी होती. ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अवॉर्ड्स अर्थात बाफ्टाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नामांकत यादीत अभिनेता रिझ अहमदचे नाव आल्याने त्याच्या चाहत्यांसाठी देखील हि चांगली बाब आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.