×
Homeताज्या बातम्याBSF Jawan Gayatri Jadhav | भारताच्या सीमा सुरक्षा बलाची पहिली महिला जवान...

BSF Jawan Gayatri Jadhav | भारताच्या सीमा सुरक्षा बलाची पहिली महिला जवान गायत्री जाधव शहीद

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन- भारताच्या संरक्षण क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी आहे. भारतात स्त्रियांना संरक्षण क्षेत्रात युद्ध भूमीवर पाठवले जाण्यास परवानगी नव्हती, आताच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना युद्ध भूमीवर जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमीची परीक्षा देण्याची परवानगी मिळाली आहे. त्यात भारताच्या सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव (Gayatri Jadhav) यांचा प्रशिक्षणादम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ती २३ वर्षाची होती.

सीमा सुरक्षा दल, भारताचे निमलष्करी दल असून त्याच्यावर मुखत्वे भारताच्या नेपाळ आणि भूतान सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. या दलाची निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण जवळ जवळ भारतीय सेने इतकेच अवघड आहे. पण स्वतःच्या हुशारी आणि कष्टाच्या जोरावर बिकट परिस्थितीवर मात करत गायत्रीने (Gayatri Jadhav) सीमा सुरक्षा दलात प्रवेश मिळवला. ती नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी होती.

सीमा सुरक्षा दलात निवड झाल्यानंतर राजस्थानमधील अलवार येथे तिचे प्रशिक्षण सुरु होते. प्रशिक्षणादरम्यान एका खड्ड्यात पडल्याने तिच्या डोक्यावर प्रचंड मार लागला होता. त्यानंतर तिच्यावर विविध ठिकाणच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. परंतु तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेने निफाड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. गायत्री जाधव बिहारच्या अररिया जिल्ह्यातील बथनाहा येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होती. ती राजस्थानमध्ये प्रशिक्षणासाठी गेलेली होती. त्यावेळी, ही दुर्घटना घडली.

प्रशिक्षणादरम्यान पडून जखमी झाल्यानंतर गायत्री जाधववर अलवर येथे मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती पुन्हा प्रशिक्षणासाठी रुजू झाली. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने तिच्या मेंदूवर दुसरी शस्त्रक्रिया जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. दुसरी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही गायत्री पुन्हा प्रशिक्षणाला रुजू झाली.

प्रशिक्षण कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ३० मार्च २०२२ ला बिहारमधील बथनाहा येथे नेपाळ सीमेवर ती रुजू झाली.
पण तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने तीने सुट्टी घेऊन नाशिकला घरी येण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर तीन महिने नाशिक आणि मुंबई येथे उपचार घेतले.
तब्येतीत सुधारणा न झाल्याने अधिक उपचारासाठी गायत्रीला दिल्लीला घेऊन जाणार होते.
पण त्यापूर्वीच मंगळवारी दुपारी तिची तब्येत बिघडली आणि तिची दृष्टी गेल्याने लासलगाव ग्रामीण
रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने तिथेच तिचा मृत्यू झाला.

Web Title :- BSF Jawan Gayatri Jadhav | niphad first women bsf jawan gayatri jadhav died injured in training at rajasthan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray – BMC Elections | मनपा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र, म्हणाले – ‘जिंकण्यासाठी मैदानात उतरूया, बीएमसी आपल्याकडेच राहणार’

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Must Read
Related News