Uddhav Thackeray – BMC Elections | मनपा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र, म्हणाले – ‘जिंकण्यासाठी मैदानात उतरूया, बीएमसी आपल्याकडेच राहणार’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray – BMC Elections | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. शिवसेनेला तर या निवडणुकीत आपल्या सर्वस्वाला दावावर लावावे लागणार आहे. कारण भाजप मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातातून काढून घेण्यासाठी धावपळ करत आहे. त्यापार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांची सत्ता आहे. ते प्रभाग पूर्नरचना करणारच. आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरुया. (Uddhav Thackeray – BMC Elections)

मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महापालिकांची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास मंत्रालयाने मंगळवारी दिले. सन 2011 च्या जनगणणेनुसार प्रभागांची रचना निश्चित करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने संबंधित महापालिकांना दिल्या आहेत. मुदत संपलेल्या आणि आगामी काळात मुदत संपणाऱ्या सर्व महापालिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका सहा महिन्याने पुढे गेल्या आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, मालेगाव, इचलकरंजी या 24 महापालिकांची मुदत संपलेली आहे. या ठिकाणी आगामी काळात निवडणुका होणार आहेत. (Uddhav Thackeray – BMC Elections)

त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेनेला महाविकास आघाडीचा पाठिंबा असला,
तरी मुंबईच्या लढाईत भाजपला मनसे पाठिंबा देणार असल्याचे चित्र आहे.
त्यांनी याबाबत अद्याप कोणताही घोषणा केलेली नाही.
तरी देखील महाविकास आघाडीला पराभव दाखविण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.
शिवसेना देखील आपली मुंबईवरील सत्ता ढळू द्यायची नाही, या प्रयत्नात आहे.

Web Title :-  Uddhav Thackeray – BMC Elections | maharashtra political news shivsena uddhav thackeray confident to win bmc election 2023 orders officials to be ready

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | लव्ह मॅरेज झाले असताना दुसरीवर जडला जीव, प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीसोबत केलं भयानक कांड; पुणे जिल्ह्यातील घटना

Shraddha Walker Murder Case | श्रद्धाच्या पत्रावर पोलिसांनी कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु