Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीमा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर विरोधी पक्ष सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही मागणी 2012 सालची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. (Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue)

कर्नाटकात भाजपचे राज्य आहे. बसवराज बोम्मई यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटले, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावे कर्नाटकात सामील करण्याचा विचार आम्ही गांभीर्याने करत आहोत. त्यावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ही मागणी 2012 साली झाली होती. यावेळी या गावांमध्ये पाणी टंचाई होती. म्हणून या गावांनी कर्नाटक राज्यात जाण्याचा विचार केला होता. त्यानंतर आपण तेथे बऱ्याच योजना नेल्या आणि पाणी दिले. त्यामुळे आगामी काळात पाण्यामुळे एकही गाव कर्नाटकात जाण्याच्या विचार करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

एकही गाव किंवा तालुका महाराष्ट्रातून बाहेर जाण्याचा विचार करणार नाही.
त्यांचे सर्व प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. तसेच त्यांचे प्रश्न आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल. आम्ही या प्रश्नावर सर्व नेत्यांची एक बैठक देखील घेतली आहे. हा विषय सामोपचाराने सुटावा असे आम्हाला वाटत आहे. यात कोणीही वाद निर्माण करून गुंतागुंत करू नये असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत, असे यावेळी शिंदे म्हणाले.

Web Title :-   cm eknath shinde comment on karnataka maharashtra border village issue in ahmednagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | लव्ह मॅरेज झाले असताना दुसरीवर जडला जीव, प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीसोबत केलं भयानक कांड; पुणे जिल्ह्यातील घटना

Shraddha Walker Murder Case | श्रद्धाच्या पत्रावर पोलिसांनी कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु