BSNL Best Recharge Plan | बीएसएनएलचा बेस्ट प्लॅन ! 797 रुपयांत SMS, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह अनेक सुविधा

BSNL Best Recharge Plan | bsnl rs 797 plan details 395 days validity 2gb data per day check all benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL Best Recharge Plan | भारतातील अनेक टेलिकाॅम कंपन्या आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅान्स जारी करत असते. अनेक वेगवेगळे आणि ग्राहकांना फायदेशीर प्लॅन्स आणत असते. अलीकडेच रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) प्लॅनचे दर वाढवल्याने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहे. मात्र, बीएसएनएल (BSNL) ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदेशीर प्लॅन्स (BSNL Best Recharge Plan) जारी करत असते. त्याचबरोबर बीएसएनएलने आपल्या प्लॅन्समध्ये कुठलाही बदल केला नाही. अशाच फायदेशीर प्लॅन्सबाबत जाणून घ्या.

797 रुपयांचा प्लॅन –

बीएसएनएलचा 797 रुपयांचा प्लॅन 395 दिवसांच्या वैधतेसह मिळतो. लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने अतिरिक्त 30 दिवसांची वैधता ऑफर करण्याची घोषणा केली. युजर्संनी 12 जून 2022 पर्यंत प्लॅनची निवड केली तरच त्यांना अतिरिक्त वैधता मिळू शकणार आहे. खरंतर युजर्स केवळ पहिल्या 60 दिवसांसाठी सर्व फायदे मिळवू शकतील. 60 व्या दिवसानंतर, युजर्संना कॉल करण्यासाठी अथवा इंटरनेट ब्राउझ (Browse The Internet) करण्यासाठी टॉक टाइम अथवा डेटा प्लॅनची निवड करावी लागणार आहे. (BSNL Best Recharge Plan)

फायदा काय?

बीएसएनएलच्या 797 रुपयांच्या प्लॅनमध्ये (BSNL Recharge Plan) पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. 60 व्या दिवसानंतर, डेटाचा वेग 80 Kbps पर्यंत कमी होतो. आधी सांगितल्याप्रमाणे, प्लॅन अंतर्गत ऑफर केलेला डेटा आणि कॉलिंग फायदे 60 दिवसांनंतर संपतात, परंतु सिम अॅक्टिव्ह राहते.

जिओ, एअरटेल आणि Vi चा वर्षभराचा प्लॅन –

Advt.

Vodafone Idea चा 1799 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 24GB डेटा आणि 3600SMS मिळतात.
एअरटेलकडेही इतक्याच किंमतीचे प्लॅन आहे, त्यामध्ये सुद्धा Vodafone Idea प्रमाणे बेनिफिट्स मिळतात.
याशिवाय Jio चा 2545 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited Calling)
आणि 100 SMS प्रतिदिन 365 दिवस मिळत आहेत.

Web Title : BSNL Best Recharge Plan | bsnl rs 797 plan details 395 days
validity 2gb data per day check all benefits

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा