Pune Crime | ‘जपानमधून 100 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करतो’ असे सांगून व्यापाऱ्याला 34 लाखांना गंडा

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नविन प्रोजेक्टसाठी 100 कोटी रुपये कर्ज रक्कमेचा (Provides 100 Crore Loan) जपानमधून (Japan) थेट पुरवठा करुन देतो, असे सांगून एका व्यावसायिकाची (Cheating With Businessman) 100 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) जयशंकर तियाघ राजन (Jaishankar Tiagh Rajan)
याच्याविरुद्ध IPC 420, 406 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

याबाबत सुधिर उद्धवराव देशखैरे (वय-49 रा. डी. 102 टायटाईन पार्क स्ट्रिक्स वाकड – Wakad) यांनी चाकण पोलीस ठाण्याच्या म्हाळुंगे चौकीत (Mahalunge Police Chowki) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी जयशंकर तियाघ राजन (रा. अलंकापुरी सी 551 एमआयटी रोड, कोथरुड – Kothrud) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार जुन 2021 ते 17 एप्रिल 2022 या दरम्यान खेड तालुक्यातील (Khed Taluka) निघोजे येथिल सुद्धप्राम कंपनीमध्ये घडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना मी स्कायलाईन प्रॉफिट्स ग्रुप हाँगकाँग शाखा (Skyline Profits Group Hong Kong Branch), जपान येथून 100 कोटी कर्ज पुरवठा करुन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
आरोपीने 60 दिवसांच्या आत कर्ज मंजुर करुन देतो असे सांगून कामाच्या मोबदल्यात फिर्यादी यांना वेळोवेळी 34 लाख रुपये बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले.
दरम्यानच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजुर न झाल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांचा आरोपीने अपहार केला.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Cheating Fraud Case of Rs 34 lakh to trader for providing Rs 100 crore loan from Japan chakan police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा