खुशखबर ! BSNL ची भन्नाट ऑफर, 599 रुपयांत दररोज 5 GB डेटा अन् अनलिमिडेट कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षात अन्य टेलिकॉम कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) सज्ज झाली आहे. कंपनीने ग्राहकांसाठी शानदार प्लॅन्स सादर केले आहेत. BSNL ने नुकताच ग्राहकांसाठी अगदी हटके प्लान आणला आहे. 599 रुपयांच्या रिचार्जवर उत्तम सुविधा दिल्या जात आहेत. वास्तविक पाहता व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या कंपन्यांचेही 599 रुपयांचे प्लान आहेत. मात्र, तरीही BSNL चा प्लान वेगळा ठरत आहे. प्रीपेड रिचार्ज प्लानचा एकूण आढावा घेतल्यास 599 रुपयांच्या प्लानमध्ये BSNL बाजी मारत आहे.

BSNL च्या 599 पये किमतीचा प्लान 2G, 3G आणि 4G यापैकी कोणत्याही नेटवर्कवर वापरला जाऊ शकतो. या प्लानमध्ये युझर्संना प्रतिदिन 5 जीबी डेटा दिला जातो. तसेच एकूण 84 दिवस वैधता असलेल्या प्लॅनमध्ये ग्राहकाला तब्बल 420 जीबी डेटा दिला आहे. याशिवाय अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रतिदिन 100 एसएमएस अशा अन्य काही सुविधा देण्यात आल्या आहेत.

Jio चाही 599 रुपयांचा प्रीपेड प्लान ऑफर केला जातो. मात्र, त्यात केवळ 2 जीबी डेटा दिला जातो. Vi च्या 599 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 1.5 जीबी डेटा दिला जातो. तर, Airtel कडून 598 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये 1.5 जीबी डेटा दिला जातो. सदर कंपन्यांच्या या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे.