Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL ने ‘या’ 2 प्लानला केले रिवाइज

पोलीसनामा ऑनलाईन टीम : नवीन वर्षात युजर्संना आकर्षित करण्यासाठी बीएसएनलने नवीन प्लान आणले आहेत. सोबतच जुन्या प्लानला रिवाइज करण्यास सुरुवात केली आहे. या यादीत आता कंपनीने आपला ३९९ रुपये आणि ५२५ रुपयांचे पोस्टपेड प्लानला रिवाइज केलं आहे. या प्लान्समध्ये दर महिन्याला ८५ जीबी पर्यंत डेटा ऑफर केला जात आहे. तसंच या प्लानमध्ये कंपनी युजर्संना २५५ जीबी पर्यंत डेटा रोलओवर ऑफर करीत आहे.

BSNLचा ३९९ रुपयांचा प्लान
या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात १०० फ्री एसएमएस दिले जातात. प्लानमध्ये कंपनी कोणतीही अतिरिक्त बेनिफिट देत नाही. प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी दर महिन्याला ७० जीबी डेटा देत आहे. हा प्लान २१० जीबीच्या रोलओवर डेटा बेनिफिट सोबत येतो. प्लानच्या सब्सक्रायबर्सला देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग करता येवू शकते.

BSNLचा ५२५ रुपयांचा प्लान
५२५ रुपयाचा मंथली रेंटल प्लानमध्ये कंपनी आता महिन्याला ८५ जीबी डेटा देत आहे. प्लानमध्ये २५५ जीबी पर्यंत डेटा रोलओवर बेनिफिट मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस मिळते.

जिओचा ३९९ रुपयांचा प्लान
प्लानमध्ये कंपनी १९९ रुपयांचा नेटफ्लिक्स मोबाइल प्लान, ९९९ रुपयांचे अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन आणि ३९९ रुपयांचे डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी सब्सक्रिप्शन देत आहे. प्लानमध्ये २०० जीबी पर्यंत रोलओवर डेटा बेनिफिट मिळते. जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये युजर्संना दर महिन्याला ७५ जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस सोबत येतो.