MIDAS School of Entrepreneurship | मिडास स्कूल ऑफ आंत्रप्रेन्योरशिप पुणे मधील नवोदित उद्योजकांनी स्टार्ट अपच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना वास्तवात उतरवत उद्योगविश्‍वात एक पाऊल ठेवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोविड-19 महामारीला तोंड देत, पुण्यातील मिडास स्कूल ऑफ आंत्रप्रेन्योरशिपच्या (MIDAS School of Entrepreneurship) नऊ विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनांना स्टार्ट अपच्या माध्यमातून वास्तवात उतरवले आहे. मिडास संस्थेच्या ‘मिडास बाजार’ या वार्षिक कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीदरम्यान आयोजित प्रदर्शनात संस्थेच्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी 20 हून अधिक उद्योगांचे सादरीकरण केले. हा कार्यक्रम संस्थेच्या मुंढवा येथील फ्लोरिडा इस्टेट कॅम्पस येथे संपन्न झाला. स्टार्ट-अप्सचे एका यशस्वी उद्योगात परिववर्तन व्हावे, ते राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य व्यावसायिक संस्था बनावी, यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. चित्रपट निर्मात्या मानसी बागला, मिनीफिल्म्सचे संस्थापक आणि Minihomes.co.in चे गुंतवणूक तज्ज्ञ वरुण बागला तसेच भारतातील सर्वात लोकप्रिय लेखकांपैकी एक, रस्किन बॉंड यांचा नातू आणि रस्किन बॉंड कलेक्‍शनचे संस्थापक सिद्धार्थ बॉंड हे या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी होते. (MIDAS School of Entrepreneurship)

 

मिडास बाजार हा विद्यार्थी ते उद्योजक या प्रवासाचे शिखर आहे. संस्थेत येणारे विद्यार्थी हे आपल्या 11 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत अनेक चढ-उतारातून पुढे येतात. यादरम्यान ते एखादी कल्पना ओळखणे, ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळवून घेणे, उत्पादनाचे प्रमाणीकरण करणे आणि ते प्रत्यक्षात उतरवणे या प्रक्रियेतून जातात आणि सरतेशेवटी त्यांच्या कल्पना जगासमोर प्रदर्शित होतात. मिडास बाजार हे एक असे व्यासपीठ आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविण्यपूर्ण कल्पना, त्यांचे उत्पादन हे मुख्य उद्योजकीय परिसंस्थेसमोर सादर करण्याची संधी देते.

 

 

 

मिडास स्कूल ऑफ आंत्रप्रेन्योरशिपचे (MIDAS School of Entrepreneurship) संस्थापक आणि मुख्य मार्गदर्शक पराग शाह (Parag Shah, Founder and Chief Mentor, MIDAS School of Entrepreneurship) म्हणाले, “इंग्रजी शब्द ‘आंत्रप्रेन्योर’ अर्थात उद्योजक या शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘आंतर-प्रेरणा’ या शब्दापासून झाली आहे, ज्याचा अर्थ मनापासून एखादी गोष्ट करण्यासाठीची इच्छाशक्‍ती. मिडास येथे आम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्यामधील आंतरप्रेरणा शोधण्यासाठी व्यासपीठ तयार करतो. तसेच त्यांच्या कल्पनांना सत्यात उतरविण्यासाठी आवश्‍यक ते कौशल्यगुण विकसित करण्यासाठी त्यांना मदत करतो. नव-उद्योजकांनी अपयशी व्हावे, मात्र ते सुरवातीच्या टप्प्यात आणि फार मोठी हानी न होऊ देता, त्यामुळे त्यांना नवीन दिशा शोधण्यासाठी अधिक बळ मिळेल, असा आमचा विश्‍वास आहे. आम्हाला नावीन्यता आणि उत्कृष्टता केंद्रस्थानी ठेवून जबाबदार नेतृत्व तयार करायचे आहेत जे उद्योजकता आणि समाजाचे भविष्य घडवतील. नजीकच्या भविष्यात संस्थेतून अनेक उद्योग क्षेत्रातील युनिकॉर्नस घडवेत, अशी माझी कल्पना आहे.”

 

मिडास’ची स्थापना उद्योजक घडवण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आली होती.
आमचा विश्वास आहे की कोणी जन्मापासूनच उद्योजक नसतो, तर ते घडविले जातात.
उद्योजकांनी स्वत:मध्ये प्रबळ आत्मविश्‍वास जोपासण्याबरोबरच, प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी लवचिक असणे आवश्‍यक आहे.
आमच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे, ज्यामुळे ते केवळ व्यावसायासाठीच तर जीवनातील आव्हानांसाठीही तयार होती.
भारत हे नावीन्यपूर्ण उद्योजकतेचे तेचे नवीन केंद्र आहे, आणि ज्या वेगाने कंपन्या प्रगती करू शकत आहेत, तसे वातावरण या आधी कधीच नव्हते.
आम्हाला उद्योजकता हा अधिक व्यवहार्य “करिअर ऑप्शन’ बनवायचा आहे.
तसेच भविष्यात प्रगतीशील उद्योजकांसाठी वाढीच्या विविध टप्प्यांवर आवश्‍यक आणि उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम तयार करायचे आहेत,
असे मिडासच्या व्यवस्थापकीय संचालिका पूजा शाह (Pooja Shah, Managing Director – MIDAS) यांनी सांगितले.

 

MIDAS बद्दल :

मिडास स्कूल ऑफ आंत्रप्रेन्योरशिप ची स्थापना 2013 मध्ये उद्योजक निर्माण करण्याच्या आणि
त्यांच्या उद्योजकतेसाठी एक पोषक परिसंस्था प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आली.
ही संस्था भारतातील सर्वोत्तम स्टार्ट-अप अभ्यासक्रमांसह उद्योजकता शिक्षणात अग्रणी आहे.
मिडास स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिपला नुकतेच अस्पायर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे
“भारतातील तिसरे सर्वोत्कृष्ट उद्योजकता संस्था’ म्हणून स्थान देण्यात आले. आमचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सर्जनशीलता, गंभीर विचार, नाविन्य आणि अनुभवात्मक शिक्षण यावर लक्ष केंद्रित करतो. हे तरुण उद्योजकांना व्यावहारिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून उद्योजकाची मानसिकता विकसित करण्याची आणि कल्पनेच्या माध्यमातून व्यवहार्य व्यवसाय सुरू करण्याचा प्रवासाची संधी देते. या संस्थेबाबत आणि येथील अभ्यासक्रमांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संस्थेच्या www.midasindia.net या संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

 

Web Title :- Budding Entrepreneurs from MIDAS School of Entrepreneurship Pune Transform Ideas Into Real Business Start-Ups

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा