Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! स्वस्त होणार Smartphone आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | लॉकडाऊन दरम्यान जगभरात इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट (electronic products) साठी लागणार्‍या सेमीकंडक्टर्सची (semiconductors) टंचाई निर्माण झाली होती. ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस (electronic device) ची निर्मिती करणार्‍या कंपन्यांच्या प्रॉडक्शनवर मोठा परिणाम झाला होता. भारताचे तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Technology Minister Ashwini Vaishnav) यांनी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरर्ससाठी 10 बिलियन (जवळपास 76,090 कोटी रुपये) प्रोत्साहन निधीची घोषणा केली आहे. मोदी सरकारने (Modi Government) दोन्ही बाजू मजबूत बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

इतर देशांवरील अवलंबत्व कमी होईल
मोदी सरकारने (Modi Government) म्हटले आहे की, या योजनेंतर्गत डिस्प्ले आणि सेमीकंडक्टर फॅब्रिकेटर्स प्रोजेक्टच्या खर्चाच्या 50 टक्केपर्यंत फायनान्शियल सपोर्ट ऑफर करेल. जर भारत ग्लोबल इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्शन हब बनला तर येथे स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस स्वस्त होतील. यामुळे सरकारचे हे पाऊल भारतीयांसाठी मोठा फायदा ठरू शकते. सोबतच भारताचे इतर देशांवरील अवलंबत्व सुद्धा कमी होईल.

कंपन्या डिस्प्ले सुद्धा बनवतील
माहितीनुसार, अनेक परदेशी कंपन्या आहेत ज्यांना आपला चिप प्रॉडक्शन प्लांट भारतात लावायचा आहे आणि त्या सातत्याने भारत सरकारच्या संपर्कात सुद्धा आहेत. आगामी काळात भारतात परदेशी कंपन्यांचे प्रॉडक्शन प्लांट पहायला मिळू शकतात. जे सेमी कंडक्टर्स चिप आणि डिस्प्ले सुद्धा बनवतील. (Modi Government)

 

यामुळे वाढते इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत
भारतात सेमी कंडक्टर्स आणि डिस्प्लेचे प्रॉडक्शन कमी होत असल्याने दुसर्‍या देशांतून ते आयात करावे लागतात.
ज्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सची किंमत खुप वाढते.
मात्र, सरकारच्या नवीन निर्णयाने इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स निर्माता कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

Web Title :- Modi Government | Modi government announced 10 billion dollars package for semiconductor chip and display manufacturers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | भाजपने संपूर्ण शहरात लावलेल्या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सत्ताधारी BJP ने लावले नाहीत – राष्ट्रवादी काँग्रेस

Cristiano Ronaldo Girlfriend List | अबब…! क्रिस्टियानो रोनाल्डोनं 13वर्षात केलं चक्क 18 गर्लफ्रेंडला डेट, यामध्ये होता ‘या’ भारतीय अभिनेत्रीचा समावेश

Jalgaon Bhusaval News | भुसावळमध्ये भाजपच्या तब्बल 30 नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Katrina Kaif First Rasoi | कैटरिना कैफनं शेअर केला ‘पहिल्या रसोई’चा फोटो, विक्की कौशल आणि कुटुंबासाठी बनवली खास स्वीट डिश..!