Budget 2019 : इलेक्ट्रिक कार घेणार्‍यांसाठी खुशखबर ! GST दरात कपात, आयकरात दीड लाखाची सवलत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. इलेक्ट्रिक कारना लोकप्रिय बनविण्यासाठी त्यांच्यावरील GST च्या दरात कपात केली आहे. त्याच बरोबर इलेक्ट्रिक कार खरेदीवर आयरात सवलत दिली जाईल. सरकारच्या या निर्णयानंतर इलेक्ट्रिक गाडयांच्या किंमतीत घसरण होईल. इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी घेण्यात आलेल्या कर्जाच्या व्याजावर आयकरात दीड लाखांपर्यंत सवलत मिळेल.

इलेक्ट्रिक वाहनांवरील GST मध्ये १२ % कपात

निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहनांवरील GST मध्ये १२ % कपात करून ५ % केले आहे. सरकारने यासाठी GST काउन्सिल कडे प्रस्ताव पाठवला आहे. या महिन्यात होणाऱ्या GST काउन्सिलच्या बैठकीत या दरामध्ये कपात केली जाऊ शकते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरी चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन आणि इंफ्रास्ट्रक्चर वाढविण्याची घोषणा केली आहे. आर्थिक पाहणी अहवालात देखील इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान देण्यापेक्षा बॅटरी फास्ट चार्जिंग सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे म्हंटले होते.

१० हजार कोटींचे अनुदान

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, एप्रिल २०१९ पासून लागू असलेल्या फेम २ योजनेनुसार इलेक्ट्रिक वाहनांवर अनुदान देण्यात येत आहे. यासाठी सरकारने १० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय