अर्थसंकल्प 2021 : स्मार्टफोन ते टीव्ही फ्रीज पर्यंत वाढू शकतात किंमती, अर्थमंत्री करू शकतात घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी बजेटमध्ये केंद्र सरकार स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट आणि उपकरणांसह सुमारे 50 वस्तूंवर आयात शुल्क 5-10 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा करू शकते. एका वृत्तसंस्थेने या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवाला देऊन ही माहिती दिली. आयात शुल्कात वाढ करण्याचा सरकारचा हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी असेल. सरकारच्या या हालचालीद्वारे 200-210 अब्ज रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याचे समजते. आर्थिक मंदीमुळे कोरोना विषाणूच्या साथीमुळे सरकारच्या महसुलावरही परिणाम झाला आहे.

तसेच, आयात शुल्कात झालेल्या या वाढीचा फर्निचर आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या आयातीवर सर्वाधिक परिणाम होणार असल्याचेही म्हंटले जात आहे. याचा परिणाम स्वीडिश फर्निचर कंपनी आयकेआ आणि इलोन मस्कची कंपनी टेस्लावर होईल. अलीकडे टेस्लाने भारतात येण्याच्या आपल्या तयारीविषयी माहिती दिली आहे. परंतु, या फर्निचर व इलेक्ट्रिक वाहनांवर किती आयात शुल्क वाढविले जाईल, याची अदयाप माहिती नाही.

फ्रीज आणि एसी होऊ शकतात महाग
यापूर्वी टेस्ला आणि आयकेईए दोन्हींच्या अधिकाऱ्यांनी भारतातील सध्याच्या आयात शुल्काबाबत चिंता व्यक्त केली होती. याव्यतिरिक्त, फ्रीज आणि एअर कंडिशनरवरील आयात शुल्क वाढेल. या प्रस्तावांना अंतिम रूप देण्यापूर्वी काही बदलही करण्यात येतील.

गेल्या वर्षी आयात शुल्कात 20 टक्के वाढ
अलिकडच्या काळात सरकारने देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले. सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भारताच्या स्थानिक उत्पादनातून उत्तेजन मिळण्यासाठी असे कर लावणे बंधनकारक आहे. यामुळे देशांतर्गत व्यवसायाला चालना मिळेल. गेल्या वर्षी भारताने पादत्राणे, फर्निचर, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक वस्तूंच्या आयात शुल्कात 20 टक्क्यांनी वाढ केली. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. हे बजेट अश्यावेळी सादर केले जात आहे,ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था कोरोना विषाणूमुळे 7.7 टक्क्यांपर्यंत संकुचित झाली आहे.