‘म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या’; माजी मंत्र्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  म्हैस दोनदा दूध देत असते. हे ताजे दूध सर्व दुकानदारांना पाठवले जाते. कोणताही रिटेलर संध्याकाळी दूध घेत नाही, कारण दुकानं बंद असतात. त्यामुळे सरकारने संध्याकाळीही दूध विक्रिला परवानगी द्यावी, अशी मागणी उत्तर भारतीय समाजाचे नेते कृपाशंकर सिंग यांनी केली आहे. कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कौतुक केले आहे.

राज्यात सध्या 15 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामध्ये आता आणखी 15 दिवसांची भर पडली असून राज्य सरकारने 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. दूध, भाजीपाला, किराणा आणि विद्यकीय सेवांनाच यामध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र दूध व किराणा दुकानांना केवळ सकाळच्या वेळेतच परवानगी आहे.

कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तुमच्या सक्षम आणि कुशल नेतृत्वात राज्य सरकार आणि महानगरपालिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मी राज्य सरकार, बीएमसी प्रशासनाचे या कौतुकास्पद प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो. तसेच काही सूचनाही सुचवत आहे. असे म्हणत त्यांनी दूध विक्रेत्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. दूध उत्पादन गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो. म्हैस दोनदा दूध देत असते हे ताजे दूध सर्व दुकानदारांना पाठवले जात असते. कोणताही रिटेलर संध्याकाळी दूध घेत नाही, कारण दुकानं बंद असतात. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि दूध संध्याकाळी विकण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सिंह यांनी पत्राद्वारे केली आहे.