Builder Mangal Prabhat Lodha | बांधकाम व्यावसायिक शिंदे सरकारचे बनले मंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Builder Mangal Prabhat Lodha | राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज राज्याचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत असून भाजपाचे 9 आणि शिंदे गटाचे 9 मंत्री शपथ घेतील. भाजपाकडून देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. लोढा हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष होते. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) पहिल्या टप्प्यात लोढा यांना स्थान मिळाले आहे. (Builder Mangal Prabhat Lodha)

 

स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायाधीश गुमान माल लोढा यांचे मंगलप्रभात लोढा हे पूत्र आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम सुरू केले. मलबार हिल मतदारसंघाचे ते भाजपा आमदार आहेत. 1995 पासून सलग ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. देशातील श्रीमंत बिल्डरांमध्ये लोढा यांचे नाव आहे.

 

लोढा यांनी राजस्थानमध्ये एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर वकिली सुरू केली. परंतु न्यायालयात वडील न्यायाधीश असल्याने त्यांनी वकिली सोडत थेट मुंबई गाठली. मुंबईत खासगी रिअल इस्टेटमध्ये नोकरी केली. 4 वर्ष फर्ममध्ये काम केल्यानंतर बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्सचे काम केले. 1982 मध्ये एका मित्राच्या मदतीने नालासोपारा इथे जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच व्यवसायात त्यांनी जम बसवला.

 

वाजपेयींच्या रथयात्रेवेळी त्यांना अटकही झाली होती. 1995 मध्ये मलबार हिल मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली.
तेव्हा तत्कालीन नगरविकास मंत्री बी. एस. देसाई यांचा त्यांनी पराभव केला होता.

 

Web Title : – Builder Mangal Prabhat Lodha | the countrys richest builder mangal prabhat lodha became a minister in the cm eknath shinde dcm devendra fadnavis government bjp gave opportunity

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा