Bullock Cart Race | ‘बैलगाडा शर्यतीला परवानगी हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय’, वैज्ञानिक अहवालाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस म्हणाले… (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राला प्रतिक्षा असलेल्या बैलगाडा शर्यतीसंदर्भात (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वाचा निकाल दिला. डिसेंबर महिन्यात यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज कोर्टाने निकाल देत बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) परवानगी दिली. यामुळे महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला जात आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) परवानगी दिली आहे. अशा खेळांमध्ये प्राण्याचे हाल होत असल्याचा दावा करणाऱ्या याचिका प्राणीमित्र संघटनांनी (Animal Friendly Organizations) केल्या होत्या. त्यावर अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) पारित केलेला बैलगाडा शर्य़तीसंदर्भातील कायदा अवैध नव्हता हे सिद्ध झालं आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजप प्रदेश कार्य समितीच्या बैठकीसाठी पुण्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

फडणवीस पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना बैलगाडा शर्यतीसाठी कायदा (Bullock Cart Racing Law) तयार केला होता. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरु झाली. मात्र, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. बैल हा धावणारा प्राणी (Bull Running Animal) नाही, असं याचिकाकर्त्यांचं म्हणण होतं. त्यामुळे हा कायदा अवैध असल्याचंही ते म्हणाले. परिणामी कायद्याला स्थगिती मिळाली.

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आम्ही एक समिती स्थापन करुन वैज्ञानिक अहवाल (Scientific Report)
तयार केला. Running Ability of Bull म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे, हा अहवाल आम्ही न्यायालयात सादर
केला. आता प्रकरणी जेव्हा केस लागली तेव्हा आम्ही भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता
(Solicitor General Tushar Mehta) यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने लढण्याची विनंती केली.
त्यांनीही वैज्ञानिक अहवाल दाखवून कायदा वैध असल्याचे सांगितले, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले, हा वैज्ञानिक अहवाल दाखवून हा कायदा प्राण्यावर अन्याय करणारा नसल्याचे
न्यायालयात सांगितले. आज न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे सर्वार्थाने आम्ही केलेला
कायदा संवैधानिक आहे, अशा प्रकारचा निकाल न्यायालयाने दिला आहे. हा महाराष्ट्राचा आणि शेतकऱ्यांचा
विजय आहे, असे सांगताना फडणवीस यांनी याचे श्रेय महेश लांडगे (Mahesh Landge), गोपीचंद पडळकर
(Gopichand Padalkar), राहूल कूल (Rahul Kul) यांना दिले. तसेच त्यांचे अभिनंदही फडणवीस यांनी केले.

Web Title :  Bullock Cart Race | how was bullock cart race allowed referring to the scientific report devendra fadnavis said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंचा फोटो स्टॅम्पसाईज…’, देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका; म्हणाले- ‘जे खरे बाळासाहेबांचे पाईक होते ते…’ (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात; तरुणासह तिघांवर अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल