Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंचा फोटो स्टॅम्पसाईज…’, देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका; म्हणाले- ‘जे खरे बाळासाहेबांचे पाईक होते ते…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) निर्णय दिला असला तरी अद्याप 16 आमदारांच्या अपात्रतेचा (16 MLAs Disqualification) निर्णय झालेला नाही. त्यामुळे या आमदारांवर अपात्रतेची (Maharashtra Politics News) टांगती तलवार कायम असताना दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP National President J.P. Nadda) हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी भाजपच्या पदाधिकारी, पन्ना प्रमुखांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी नड्डा यांनी मुंबई महापालिका निवडणूक (Bruhan Mumbai Corporation (BMC) जिंकण्याचा निर्धार व्यक्त करताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खोचक शब्दात टीका केली.

आपल्यावर अजून काय अन्याय होऊ शकतो?

अडीच वर्ष ज्यावेळी कोरोनाचं (Corona) संकट होतं, तेव्हा दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं कोरोनाच्या संकटाबरोबर उद्धव ठाकरेंचंही सरकार (Thackeray Government) होतं. त्याला दुष्काळात तेरावा महिन्यासारखंच होतं. त्या काळात त्यांचं सरकार (Maharashtra Politics News) यावं, यापेक्षा आपल्यावर अजून काय अन्याय होऊ शकतो? पण अशा काळात भाजपाचा एकही मोर्चा घरी बसला नाही. प्रत्येकाने कोरोनाच्या काळात लोकांची सेवा केली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठाकरेंचा फोटो स्टॅम्प साईज आणि…

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, खरंतर शिवसेना (Shivsena) आपल्याबरोबर निवडून आली होती. मोदींचे (PM Narendra Modi) मोठमोठे फोटो लावून निवडून आली होती. उद्धव ठाकरेंचा फोटो स्टॅम्पसाईज आणि मोदींचा फोटो मोठा असं लावून निवडून आली होती. ती काय उद्धवजींचा फोटो लावून निवडून आली नव्हती. तरी आपल्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस (Congress-राष्ट्रवादीबरोबर (NCP) ते गेल्यानंतर शिवसेनेत जे खरे बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) पाईक होते, त्यांच्या विचारांवर चालणारे होते ते शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात बाहेर पडले. ते आपल्याबरोबर आले. ज्यांना 2019 ला जनतेने निवडून दिलं होतं. तीच शिवसेना आणि भाजपचं सरकार आज पुन्हा स्थापन झालं, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

म्हणून विकास कामं बंद होती

अडीच वर्ष मोदींचा विकास तुम्ही थांबवून ठेवला. अडीच वर्षात देशभरात मेट्रोची (Metro) कामं होत होती.
आमची मेट्रोची कामे बंद होती. रस्त्याची कामे बंद होत होती. विकास बंद होता. सगळ्या गोष्टींना स्थगिती होती.
एकच कारण होतं की सगळी कामं पूर्ण झाली तर याचं श्रेय भाजपला मिळेल, अशी टीका फडणवीसांनी केली.

राजाचा जीव पोपटात पण…

ज्यांनी केवळ वसुली केली ती किती केली हे माहिती आहेच. वाझेची गोष्ट सांगायची गरज नाही.
यांच्या वसुलीची वेगवेगळी माध्यमे आहेत. मात्र, त्यांनी माहाराष्ट्राचा सूड उगवण्याचं काम केलं.
आपलं सरकार स्थापन झालंय, पण राजाचा जीव पोपटात आहे. पण दुसरा पोपट बीएमसी आहे.
25 वर्ष हे कुरण खाऊन हे मोठे झालेत. मुंबईची तिजोरी लुटून मोठे झाले आहेत.
त्यांनी अडीच वर्ष धारावीच्या प्रकल्पाला यांनी हात देखील लावला नाही.
पुढ्या 3 ते 4 महिन्यात हे काम सुरु होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Web Title : Maharashtra Politics News | devendra fadnavis targets uddhav thackeray on bmc elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police – SP PR Patil | पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार पोलिसांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात तब्बल 116 तक्रारींचे निवारण

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र’; आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश