Burglary in Pune | आंबेगावमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; बंद फ्लॅटमधून 3 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune district) आंबेगाव बुद्रुक परिसरामध्ये (Ambegaon Budruk area) चोरट्यांचा (thieves) सुळसुळाट वाढला आहे. काही दिवसांपूर्वी फळ विक्रेत्यांची (fruit seller) बंद घरांचे कडी कोयंडा उचकटून 10 लाखांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा Burglary in Pune याच परिसरातील बंद फ्लॅट (Flat) चोरट्यांनी फोडले. यामध्ये सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याशिवाय चंदननगरमध्ये (Chandannagar) देखील फ्लॅटमधून रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) सागर खेडेकर Sagar Khedekar (वय 31 रा. सुमन संकल्प बिल्डींग, आंबेगाव बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंबेगाव बुद्रुकमध्ये (Ambegaon Budruk) राहतात. ते गेल्या मंगळवारी कुटुंबासह (Family) घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरुममधील (Bedroom) कपाटातील 3 लाख 33 हजार रुपयांचे दागिने (Jewelry) चोरून नेले आहेत. फिर्यादी हे रविवारी (दि.13) परत आले. यावेळी त्यांना चोरी झाल्याचे समजले. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

Corona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा

चंदननगरमध्ये 52 हजाराची चोरी
चोरट्यांनी चंदननगर (Chandannagar) येथेही घर फोडले असून येथून 52 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याप्रकरणी नवनाथ साळबा कुलाळ Navnath Kulal (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) अज्ञात चोरट्यांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
कुलाळ यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत 52 हजार रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने (Gold and silver jewelry) असा मुद्देमाल चोरून नेला आहे.

Web Title : Burglary in Pune house breaking in Ambegaon; stolen Rs 3 lakh from a closed flat

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक