रायगड : कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली; एक ठार, 32 प्रवासी जखमी

रायगड : मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. घाटातील एका वळणावर बस ५० फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यु झाला असून ३२ प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला.

ही खासगी बस मुंबईहून देवगडला जात होती. कशेडी घाटात भोगावजवळ बस पोहोचली असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट ५० फूट दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले़ मिळेल त्या वाहनाने या जखमींना पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात एका मुलाचा मृत्यु झाला असून ३२ जणांवर उपचार करण्यात येत आहे.