ऐतिहासिक ! लाल परीचे सारथ्य करणार आदिवासी महिला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे सारथ्य आता महिलांच्या हाती सोपविण्यात येत आहे. एस.टी. महामंडळाने एस.टी. बसच्या चालक प्रशिक्षणासाठी 163 महिलांची निवड केली आहे. या महिलांच्या प्रशिक्षणाचा प्रारंभ प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाला. विशेष म्हणजे निवड झालेल्या बहुतांश महिला उमेदवार या आदिवासी भागातील आहेत.

एस.टी. सेवेत महिलांचा चालक म्हणून समावेश झाल्याने प्रवाशांची सुरक्षा महिला करणार आहेत. या अगोदर यवतमाळ मधील आदिवासी महिलांचा एस.टी. सेवेत चालकपदी समावेश करून आदिवासी महिलांना मुख्य प्रवाहात आणले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन, सामाजिक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या महिला एसटी बस चालवू लागतील. तेव्हा त्यांचा आत्मविश्वास व धाडस सर्वांना प्रेरक ठरेल, असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केला.

मेगाभरतीत 30% जागा महिलांसाठी राखीव –

एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या मेगाभरतीत 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून 2406 पदावर महिलांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी आजपर्यंत 289 महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 163 महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

नियम

हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही भरतीसाठी अर्ज करु शकतात.
महिलांसाठी उंचीच्या अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. महिलांची उंची 160 सेंमी उंच असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र धरले जात होते. मात्र, आता उंचीची मर्यादा किमान 153 सेमी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –