बँकेकडून कोट्यावधी रूपयांचं कर्ज घेऊन ‘ऐश-आरामा’त ‘शाही’ आयुष्य जगणारा व्यापारी फरार, CBI चा तपास सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेकडून कोट्यावधी रुपये घेऊन फरार झालेल्या अजय मित्तल आणि त्यांच्या पत्नी अर्चना मित्तल यांच्या विरोधात सीबीआयने नोटीस जारी केली आहे. अजय मित्तल हे अर्शिया लिमिटेडचे चेअरमॅन देखील आहेत. अजय मित्तल हे मुबईचे प्रसिद्ध बिल्डर शंकर मित्तल यांचे पुत्र आहेत.

अजय मित्तल हे महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत त्यामुळे त्यांच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्या आहेत. अजय मित्तल यांनी 300 कोटी रुपयांचा बंगला विकत घेतला होता तेव्हा ते चांगलेच चर्चेत आले होते.

मित्तल यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी युको बँकेकडून उधार घेतलेले 289 कोटी रुपयांचा चुकीचा वापर केला. कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. लॉजेस्टिक व्यवसायाशी जोडली गेलेली होती.

अजय मित्तल यांनी दाऊदचे सहयोगी असलेल्या इकबाल मिर्ची यांची पत्नी हाजरा मिर्चीच्या नावावर रजिस्टर प्रॉपर्टीचे भाडेकरू म्हणून 24 लाख रुपए महिन्याला भाडे देत होते. मित्तल यांच्यावर आरोप आहे की, बँकेच्या कर्जाचा मोठा हिस्सा हाजरा मिर्ची यांना भाडे म्हणून देण्यात आला. सीबीआय आता या बाबत तपास करत आहे की, मित्तल यांचे इकबाल सोबत नेमके कशाप्रकारचे संबंध होते.

मिळालेल्या माहितीनुसार मित्तल हे सध्या भारताबाहेर लंडन येथे आहे. अर्शिया लिमिटेड विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने 23 डिसेंबर रोजी तक्रार दाखल करत तपास सुरु केला आहे. सीबीआयने अजय मित्तल, अर्चना मित्तल आणि बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/