खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यवसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – व्यवसायासाठी खासगी सावकाराकडून ६ टक्के व्याजाने घेतलेली रक्कम व्यजासह परत करुन देखील सावकाराने आणखी पैशांसाठी तगादा लावला. तसेच व्यवसायिकाचे राहते घर नोटरी करुन स्वत:च्या नावावर करुन घेऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. खासगी सावकाराच्या त्रासाल कंटाळून व्यवसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात खासगी सावकारासह एका व्यवक्तीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7db3772d-d137-11e8-9732-f9bf50c7931f’]

इरफान अमिरहमजा मुल्ला (वय-४५ रा. आनंद पार्क सोसायटी, वडगावशेरी) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांनी खासगी सावकार विरेंद्र जयंत जैन (रा. गिगा स्पेस आयटी पार्क, विमाननगर) आणि त्याचा साथिदार जितेंद्र अशोक भोसले (रा. नेबुला सोसायटी शेजारी, विमाननगर) यांच्या विरुद्ध विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात दुष्काळ अन्… मोदींच्या कार्यक्रमाला कोटींची उधळपट्टी : धनंजय मुंडे

[amazon_link asins=’B0745BNFYV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’951cf7da-d137-11e8-b9e7-0b030787d948′]

इरफान मुल्ला यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांनी विरेंद्र जैन यांच्याकडून  ३७ लाख रुपये घेतले होते. पैसे घेतेवेळी दरमहा ६ टक्के व्याज देण्याचे मुल्ला यांनी कबूल केले होते. मुल्ला यांनी व्याज आणि मुद्दलाची रक्कम जैन याच्या बँक खात्यावर आरटीजीएस, चेक व रोख स्वरुपात दिली होती. मुल्ला यांनी जैन याला ५७ लाख ४६ हजार रुपयांची परतफेड केली होती. पैशांची परतफेड करुन देखील जैन आणि भोसले यांनी जबरदस्तीने मुल्ला यांचे राहते घर नोटरी करुन जैन याच्या नावावर करुन घेतले. तसेच मुल्ला यांच्या घरी जाऊन आणखी १५ लाख रुपयांची मागणी करुन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

धनगर आरक्षणावरुन समाजात गैरसमज पसरविले जात आहेत  

[amazon_link asins=’B07B4TZKFN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b0426df3-d137-11e8-bdd2-9118097bacef’]
जैन आणि भोसले यांच्या जाचाला कंटाळून मुल्ला यांनी शनिवारी (दि.१३) औषधाच्या गोळ्या खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मित्रांना मोबाईलवर सुसाईड नोट लिहून जैन आणि भोसले यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला. मित्रांनी तात्काळ मुल्ला यांचा शोध घेतला असता त्यांना ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. मुल्ला यांना तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार जैन आणि भोसले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रमेश साठे करित आहेत.

जाहिरात