C-DAC Recruitment 2023 | सीडॅक करतेय १५९ सॉफ्टवेयर प्रोफेशनल्सची भरती, आजच करा अर्ज

नवी दिल्ली : सॉफ्टवेयर प्रोफेशनलसाठी (Software Profession) सरकारी नोकरीच्या संधीची वाट पहात असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and Information Technology) अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कम्प्यूटिंग (Center for Development of Advanced Computing) म्हणजे सीडॅकद्वारे (C-DAC Recruitment 2023) सॉफ्टवेयर प्रोफेशनल्ससाठी सरकारी नोकरीची भरती काढण्यात आली आहे. केंद्राद्वारे जारी भरती जाहिरातीनुसार, प्रोजेक्ट इंजिनियर, सीनियर प्रोजेक्ट इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट ऑफिसर, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ आणि पार्ट टाइम ट्रेनर्सच्या एकुण १५९ पदांसाठी भरती (C-DAC Recruitment 2023) होणार आहे.

C-DAC Recruitment 2023 : आजच करा अर्ज

सीडॅकद्वारे जाहिरात केलेल्या सॉफ्टवेयर प्रोफेशनल्सच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवार सीडॅकची अधिकृत वेबसाइट, cdac.in वर करियर सेक्शनमध्ये अ‍ॅक्टिव्ह लिंक अथवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे सबंधित भरती पोर्टल, recruitment.cdacb.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, भरतीची अर्ज प्रक्रिया २८ ऑक्टोबरपासून सुरू आहे अर्ज करण्याची आज म्हणजे शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ ही शेवटची तारीख आहे.

D-DAC Recruitment 2023 : अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता

प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी बीई/बीटेक अथवा एमसीए किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर, कम्प्यूटर सायन्स अथवा कम्प्यूटर अ‍ॅप्लीकेशनमध्ये पीजी डिग्री अथवा एमई/एमटेक केलेले अथवा संबंधित विषयात पीएचडी केलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.

उमेदवाराचे वय अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबरला ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

तर, सीनियर प्रोजेक्ट इंजिनियर पदांसाठी समान पात्रतेसह किमान ३ वर्षाचा अनुभव असावा
आणि वय ४० वर्षापेक्षा जास्त असू नये. मात्र, सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादेत केंद्र सरकारच्या
नियमानुसार सवलत दिली जाईल. इतर पदांसाठी आवश्यक पात्रता मापदंडासाठी भरती अधिसूचना पहा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याला वाहन चोरी प्रकरणी अटक, 8 दुचाकी जप्त, प्रचंड खळबळ

पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 57 वी स्थानबध्दतेची कारवाई