Pune Crime News | धक्कादायक! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याला वाहन चोरी प्रकरणी अटक, 8 दुचाकी जप्त, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुरंदर तालुक्यातील निरा येथील पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोरीच्या (Bicycle Theft) घटना रोखण्यासाठी जेजुरी पोलिसांसमोर (Pune Police) मोठे आव्हान होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दुचाकी चोरास अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता पोलिसांना धक्का बसला. दुचाकी चोरणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर चक्क पोलीस कर्मचारीच (Police Officer) निघाला. त्याच्याकडून 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. तर त्याच्याकडून दुचाकी विकत घेणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे पुणे पोलीस दलात (Pune Police Force) खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

विनोद मारुती नामदार Vinod Maruti Namdar (रा. वाणेवाडी, ता. बारामती) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर चोरीच्या दुचाकी खरेदी केल्याप्रकरणी अस्लम मुलाणी (रा. निरा, ता. पुरंदर) आणि पृथ्वीराज ठोंबरे (रा. मुरुम, ता. बारामती ) यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी विनोद नामदार हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयात (Pune Rural Police Headquarters) कार्यरत असल्याची माहिती जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर ( PI Bapusaheb Sandbhor) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील निरा हद्दीमध्ये काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दुचाकी चोरीप्रकरणी तांत्रिक तपास व खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विनोद नामदार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. (Pune Crime News)

नामदार हा गावी आल्यानंतर दुचाकी चोरी करत होता. त्यानंतर चोरलेल्या दुचाकी वेगवगेळ्या गावात लोकांना विकत होता.
यातील काही दुचाकी खरेदी करणाऱ्या मुलाणी व ठोंबरे यांना पोलिसांनी अटक केली.
त्या दोघांना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. तर विनोद नामदार याची रवानगी येरवडा कारागृहात (Yerwada Jail) केली आहे.
त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 57 वी स्थानबध्दतेची कारवाई