धक्कादायक ! डिलेव्हरी बॉयने 66 महिलांना ब्लॅकमेल करून केला बलात्कार

पोलीसनामा ऑनलाईन : एका प्रसिध्द कंपनीच्या डिलेव्हरी बॉयने महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यातून समोर आली आहे. त्याच्यावर तब्बल 66 महिलांना ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिलांना कशाप्रकारे ब्लॅकमेल करत होता हे जाणून पोलिसही हैराण झाले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी त्याच्यासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. दरम्यान लोक या डिलेव्हरी बॉयला सिरीअल बलात्कारी म्हणत असून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

विशाल शर्मा (रा. त्रिकोण पार्क, क्योटा, जि. हुगली) आणि त्याचा साथीदार सुमन मंडल याला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल शर्मा हा मुख्य आरोपी असून तो म्हणाला की, फीडबॅकच्या नावावर व्हिडीओ कॉल करतेवेळी महिलांचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ बनवल्यावर तो महिलांना ब्लॅकमेल करत होता. ब्लॅकमेल केल्यानंतर तो त्या महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. चुचुडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी विशाल शर्मा आणि सुमन मंडल या दोघांनाही अटक करून तुरुंगात टाकले आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल शर्माच्या आईनेही आपल्या मुलाचा गुन्हा मान्य केला आहे. सोबतच या कृत्यात सहभागी असल्याचा आरोपही मान्य केला आहे.