रस्त्याच्या तक्रारी साठी टोल फ्री वर संपर्क करा : सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन

माधव मेकेवाड

सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत असलेल्या रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 233 1383 सुरु करण्यात आला आहे. मा. उच्च न्यायालयाचा आदेश व शासनाच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी सुरु केला आहे. निर्देशान्वये मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद या कार्यालयात तक्रारींची दखल घेण्यासाठी ग्रीव्हन्स रिड्रेस यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4adace64-c920-11e8-89bd-a51071d03032′]

भोकर विभागातील रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी मुख्य अभियंता कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत. तसेच www.mahapwd.com या वेबसाईटवर Citizen मेनुमध्ये सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारी कार्यवाहीसाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहेत. या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

दोघाभावाची भांडण सोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा जीव थोडक्यात मुकला

[amazon_link asins=’B00YQGFY8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7770d61f-c920-11e8-9412-bdf33f4da51b’]

नांदेड : स्वर्ण ११ ,रौपे १६,कास्य १४ एवढी पदके जिंकली

राज्य जलतरण स्पर्धा २९ व ३० सप्टेंबर २०१८ रोजी संपन्न झाली या मध्ये नांदेड च्या ३८ स्पर्धकाने सहभाग नोंदवला होता राज ठाकूर यांच्या नेतृत्वात यश संपादित केले ७५ वर्षीय वयोवृद्ध श्रनोप्पा यांनी विजयाची सुरुवात केली. आंतराष्ट्रीय जलतरणपटू यांनी तर जलतरणाची मालिका जिंकली,बटर फ्लाय सारख्या अवघड जलतरण मध्ये रौप्य पदक पटकावले,प्रशांत त्रिपाठी यांनी बेस्ट स्टोक सुवर्ण व कास्य पदक पटकावले, देगलूर येथील रामचंद्र ओलेवार,वंकलवार किसन यांनी प्रत्येकी एक पदक पटकावले व ग्रामीण भागाचे नाव उंचावले प्रा उत्तम केंद्रे,प्रमोद कुंठे, ओमप्रकाश गुंजकर,प्रकाश बोकारे,प्रकाश काळे,देशपांडे, संभाजी,तहसीलदार मुगाजी काकडे,सुनील सोनाळे या सर्वांनी रौप्य १६,सवर्ण ११,कास्य १४ अशी एकूण ४१ पदके नांदेड ला मिळून दिले परिणामी विजय संघाची मात मिळाली नाही याची खंत यावेळी यांनी व्यक्त केले. या विजयी संघांना अभिनंदन पर वर्षाव अनेक नांदेड च्या लोकप्रिय खासदार,आमदार,अधिकारी,राजकीय कार्यकर्ते,व संपादक ,पत्रकार यांच्या कडून आला