लवकरच अन्नाची कमतरता भासणार ! ‘इडली-डोसा’च्या जागी ‘किडे-मुंग्या’ देखील खातील ‘हतबल’ माणसं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरातील विविध देशांत खाण्याचे अनेक प्रकार पाहिला मिळतात. खाणे-पिणे वातावरणानुसार वेगळा असतो. या मागील कारण आहे लोकांच्या शरीराची गरज. जसे वातावरण तशी गरज. पण तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यात बदल करण्यास सांगितले तर? होय आता ती गरज लवकरच निर्माण होणार आहे.

केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात दावा केला की, येत्या काही वर्षांत जगभरातील लोकांना जीवंत राहण्यासाठी कीडे-मकोडे खाण्याची वेळ येऊ शकते. युनिव्हर्सिटीचे सेंटर फॉर द स्टडी ऑफ एक्सिसटेंशिअल रिस्कच्या रिसर्च असोसिएट असफ जाचोर यांनी लोकांसमोर याचे परिणाम आणले आहेत. जग आता कठीण प्रसंगातून जात आहे. जगभरात महामारी पसरली आहे. अनेक देशांत जंगलात भीषण आग लागली आहे. या सर्व संकटांमुळे जगभरात धान्याची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे लोकांना जीवंत राहण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.

लोकांच्या आहारात होईल बदल 

असफ जाचोर यांनी सांगितले, की महामारीच्या काळात धान्याचा साठा कमी आहे. तिथं आता लोक डाळी, भाजीपाला, रोटी किंवा भात खातात. त्याचे उत्पादन बंद झाल्यानंतर लोकांना कीडे-मकोडे खावे लागतील. मासे याच डायटला फॉलो करतात. येत्या काळात धान्याची कमतरतेमुळे लोक हे सर्व खाणे सुरु करतील. जेव्हा धान्य संपेल तेव्हा लोक पोट भरण्यासाठी हे खातील. हे दोन्ही प्रोटीनचे चांगले स्त्रोत असतो.