Coronavirus : ‘करोना’ व्हायरसची लक्षणं ‘गायब’ झालेल्या रूग्णापासून फोफावतं का ‘इन्फेक्शन’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरातून पसरण्यास सुरुवात झालेला कोरोना व्हायरस 120 पेक्षा जास्त देशांत पसरला आहे. जगभरातील 1.34 लाख पेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. ज्यात 4,984 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारोंच्या संख्येने संक्रमित लोक ठीक देखील झाले आहेत. थायलंडनंतर भारतात देखील डॉक्टर एचआयव्ही, स्वाइन फ्लू, मलेरिया या औषधांद्वारे रुग्णांवर उपचार करत आहेत. आता प्रश्न हा आहे की व्हायरसवर उपचार करुन जे लोक बाहेर आले आहेत ते पुन्हा दुसऱ्या कोणाच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरणार तर नाही ना ? कारण व्हायरस 2 आठवडे शरीरात जीवंत राहतो.

चीनच्या बाहेर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले की संक्रमित व्यक्ती ठीक झाल्यानंतर किमान दोन आठवडे तरी कोरोना व्हायरस शरीरात असू शकतो. यावर अमेरिकेच्या टेंपल युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या संशोधनात काही निष्कर्ष समोर आले. महामारी विशेषज्ञ क्रिस जॉन्सन म्हणाले, या अध्ययनातून चांगले निष्कर्ष निघाले. मानव शरीरात जर कोणताही व्हायरस नुकसान न करता पडून राहिला असेल तर शरीर त्याच्या प्रतिरक्षेची तयारी करते. असे झाल्यास आपण पुन्हा त्या व्हायरसमुळे संक्रमित होत नाही. कारण आपली रोगप्रतिकार क्षमता त्याला सहज सामोरे जाते.

वुहानच्या 4 मेडिकल प्रोफेशनल्सवर केला गेला होता शोध –
जर्नल जामा मध्ये प्रकाशित शोधात, 30 ते 36 वर्ष वयाच्या चार मेडिकल प्रोफेशनल्सचे अध्ययन केले. हे चौघे कोरोनामुळे संक्रमित होते. ते उपचारानंतर ठीक झाले. त्यांचा उपचार अँटी व्हायरल औषध ऑसेल्टामिवीरचा डोस देण्यात आला आहे. हे औषध टॅमीफ्लू नावाने ओळखले जाते. त्यानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. डॉक्टरांनी चौघांना पाच दिवस घरात एकटे ठेवले. या चौघांच्या घशात 5 ते 13 दिवस सूज होती.

ठीक झाल्यानंतर 5 ते 13 दिवस करण्यात आलेल्या चाचणीत ते पॉझिटिव्ह होते. त्यानंतर त्यांच्यातील लक्षण दिसेनाशी झाली. त्यांच्या शरीरात 13 दिवस व्हायरस होते. जॉनसन म्हणाले की जपानमध्ये देखील एक महिला संक्रमणातून बरी झाली. परंतु त्यानंतर काही दिवसांनी ती पुन्हा आजारी पडली. क्रिस म्हणाले की, डॉक्टरांना याचे कारण अद्यापही समजत नाही. असे होऊ शकते की ही महिला कदाचित दुसरा एखाद्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आली असेल.

झिका आणि इबोला व्हायरस शरीरात होते –
मिशिगन टेक युनिव्हर्सिटीनुसार व्हायरोलॉजिस्ट एबनेजर टंबन यांच्या मते, रिकव्हरीनंतर शरीरात व्हायरस असणे साधारण आहे. उदाहरण म्हणून झिका आणि इबोला व्हायरस रुग्णांच्या रिकव्हरीनंतर त्यांच्या शरीरात अनेक महिने व्हायरस होता. असे असेल की टॅमीफ्लूने त्यांच्या शरीरातील व्हायरसची संख्या कमी झाली असेल. जे शोधण्यासाठी आपल्याकडे पर्याप्त तंत्रज्ञान नाही. असे असू शकते की उपचारानंतर शरीरातील व्हायरसची संंख्या परत वाढत असेल.

ठीक झालेल्या लोकांनी घ्यावी खबरदारी –
टंबन म्हणाले, लोकांनी घरात देखील एकमेकांशी हात मिळवताना वैगरे टाळले पाहिजे. लांबून संपर्क ठेवला पाहिजे. खोकला, सर्दी झाल्यावर हात धुतले पाहिजेत. जर त्यांच्या शरीरात व्हायरसची प्रमाण कमी असेल तर त्यांच्यासोबत जेवल्याने, पाणी पिल्याने व्हायरस संक्रमित होणार नाही. शोधकर्त्यांनी सांगितले की चारही रुग्ण कोरोना व्हायरसमुळे निगेटिव्ह होते. अशावेळी त्यांनी व्हायरस पसरु नये म्हणून काळजी घेतली. जॉनसन यांच्या मते एकदा व्हायरस झाल्यास त्यावर उपचार झाल्यानंतर त्या व्यक्तीची प्रतिकार क्षमता वाढते. त्यांना पुन्हा इंन्फेक्शन होणं जवळपास अशक्य आहे.