कर्णधार ते वझीर-ए-आजम पर्यंतचा प्रवास पूर्ण

इस्लामाबाद : वृत्तसंस्था 

“२२ वर्षांच्या संघर्षानंतर माझी प्रार्थना देवाने ऐकली. मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची आणि देशसेवेची संधी मिळाली आहे” अशी प्रतिक्रिया  इम्रान खान  यांनी पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणूक जिंकल्यानंतर दिली आहे. पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांच्या पक्षाने १२० जागा जिंकल्या. या मोठ्या विजयानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
[amazon_link asins=’B07D9TP3S1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6040bb3c-90e7-11e8-81f9-e7da98c63b91′]

इम्रान खान म्हणाले, १९९६ साली तहरीक-ए-इन्साफची स्थापना केली होती. ही संधी मला अल्लाहने दिली आहे. या संधीकरिता मी २२ वर्ष संघर्ष केला आहे. आता मला माझे घोषणापत्र लागू करण्याची संधी मिळाली. यावेळी मी मोहोम्मद अली जीना यांचे जे पाकिस्तानसाठी स्वप्न होते ते पूर्ण करणार आहे. मी पाकिस्तानला प्रगती करताना पाहिले आहे आणि पुन्हा खाली येताना देखील पहिले आहे.

ही निवडणूक ऐतिहासिक आहे. पाकिस्तानात माणुसकीचे शासन असले पाहिजे. पाकिस्तानात अडीच कोटी मुले शाळे बाहेर आहेत. जे कोणी देशाच्या विरोधात जाणार त्यांच्याविरोधात कारवाई करणार मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असे  मत इम्रान खान यांनी व्यक्त केले. पाकिस्तान समोर अर्थव्यवस्थेचे मोठे आव्हाण आहे. आज पाकिस्तान कर्जबाजारी आहे. त्यामुळे पाकिस्तानात गुंतवणूकीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देणार असल्याची असल्याचे सांगितले. यावेळी खान यांनी सरकारी व्यवस्था सुधारण्याचे आणि भ्रष्टाचार रोखणार असल्याचे आश्वासनही दिले.