धुक्यात ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून आपण हायवेवर सुरक्षितपणे चालवू आपली कार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या थंडीचा हंगाम सूरू आहे. त्यात आपल्याला अनेक वेळा हायवेवर ड्रायविंग करावी लागते. मात्र, धूक्यामूळे कार चालविण्यात अनेक अडथळे येतात. जर ड्रायविंग करताना सावधगिरी बाळगली नाही तर ॲक्सीडंट होऊ शकतो. अशा परिस्थीत जाणून घेऊया हायवे वर ड्रायविंग कशी करू शकतो.

इंडीकेटरचा वापर –
बहूतेक लोक दिवसा हायवेवर ड्रायविंग करतात. तर अनेक वेळा इंडीकेटरचा वापर केल्याशिवाय लेन चेंज करतात. असे करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यात रात्रीच्या वेऴी ही समस्या जीवघेणी बनते. अशावेऴी ॲक्सीडेंटपासून वाचण्यासाठी इंडीकेटरचा वापर करावा. यामूऴे आपण हायवेवर जास्त सुरक्षित प्रवास करू शकतो.

इकोनोमी स्पीड –
हायवेवर गाडी चालविताना कार गती गतीवर ठेवली पाहिजे. कारण कधीही आपल्यासमोर धूके येऊ शकते. अशा परिस्थीतीत स्पीड कमी असल्यास आपण समोर चालणा-या वाहणांना पाहण्यास सक्षम असू आणि त्या कार्सच्या मागे सुरक्षित ड्रायविंग करत राहू. पंरतू जास्त वेगाने गाडी चालविताना आपल्यासमोर अचानक एखादी गाडी आल्यास आपल्याला संधी मिळणार नाही आणि सहज अपघाताला सामोरे जाल.

हॉर्नचा वापर :
धुक्यामुळे आपल्याला समोरील वाहने व्यवस्थित दिसत नसतील तर हॉर्न वाजविल्यामूळे काहीही बिघडणार नाही, असे केल्याने तुम्ही तुमची सुरक्षा सुनिश्चित करू शकता कारण बर्‍याच वेळा पुढच्या कारचालक हे देखील माहित नाही की आपली कार मागे धावत आहे, तर आपण अपघाताची शिकार होऊ शकता.

अप्पर-डिपरचा वापर :
कार चालविताना हायवेवर जास्त धुके असल्यास, आपण आपल्या कारच्या हेडलाइटवरील अप्पर डिपर बीम वापरू शकता. हे आपल्या समोर वाहने पाहणे सुलभ करते आणि आपण सुरक्षितपणे वाहन चालवू शकता.