खुशखबर ! मोदी सरकारची नवीन योजना, ‘स्वयंपाक’ घरात वापरलेल्या खाद्यतेलावर ‘धावणार’ तुमची कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकांसाठी एकापेक्षा एक धडाकेबाज योजना आणणारे मोदी सरकार आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वयंपाकासाठी एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्याची नवी पद्धत सरकारने शोधून काढली असून आता या उरलेल्या तेलापासून बायोडिझेल बनवण्याची तयारी सुरू केली आहे. आज यासंदर्भात नवीन अ‍ॅप आणि पोस्टरचे उदघाटन देखील सरकारने केले आहे. आजच्या दिवसाचे वैशिष्ठय म्हणजे आज ‘जागतिक जैवइंधन दिन’ आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या ट्विटर वरून देण्यात आली आहे.

नेमकी काय आहे योजना :
एकदा स्वयंपाकासाठी वापरलेले तेल पुन्हा जेवणासाठी वापरणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या गेलेल्या खाद्यतेलाचा परत जेवण बनविण्यासाठी वापर केला गेल्यास उच्च रक्तदाब, एथेरोस्क्लेरोसिस, अल्झायमर आणि यकृताचे विविध आजार होण्याचा धोका असतो. म्हणूनच आता सरकारी तेल विपणन कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम(एचपीसीएल), भारत पेट्रोलियम(बीपीसीएल), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन(आयओसी) वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलापासून बनविलेले बायो डीझेल खरेदी करतील. त्यानुसार कंपन्यांनी आज म्हणजेच १० ऑगस्टपासून बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये स्वयंपाकाच्या तेलापासून बनविलेले बायोडीझेल खरेदी करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.

यासाठी सुरु केले नवीन अ‍ॅप
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला असून आता वापरलेले स्वयंपाकाचे तेल जमा करण्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे आहे. आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मध्ये ‘आम्ही बायोडिझेल बनवण्यासाठी वापरलेले स्वयंपाक तेल पुरवतो’ असे स्टिकर ठेवतील. यानंतर या कंपन्या लिटरमागे ५१ रुपये निश्चित दराने बायो डीझेल खरेदी करतील. दुसर्‍या वर्षी किंमती वाढून ५२.७ रुपये व तिसर्‍या वर्षी ५४.५ रुपये प्रति लीटर केले जाईल.

आरोग्यविषयक वृत्त