CBSE बारावी प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात झाला निर्णय, ‘अशी’ होणार परीक्षा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शालेय आधारित मूल्यांकनामध्ये काही बदल केले आहेत. काही शाळा कोरोना (Corona) महामारीमुळे प्रॅक्टिकल (Practical Exam) किंवा अंतर्गत मूल्यांकन (Internal evaluation) परीक्षा घेऊ शकले नाहीत. हे लक्षात घेऊन बोर्डाने (CBSE) शाळांना ऑनलाइन परीक्षा (Online exam) घेण्यास आणि त्यांचे गुण अपलोड करण्यास 28 जून पर्यंतची मुदत दिली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची महत्वाची माहिती, म्हणाले – ‘महाराष्ट्रात Black Fungus चे सर्वाधिक रुग्ण’

बोर्डाकडून विषयांची यादी जाहीर
CBSE बोर्डाने ज्या विषयांच्या अंतर्गत परीक्षा घेण्यात येणार आहेत, अशा विषयांची यादी जाहीर केली आहे.
लेखी आणि प्रॅक्टिकल गुणांचे विभाजन, प्रकल्पाची वेळ आणि परीक्षांचा कालावधी यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 514 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत

CBSE ने काय म्हटले ?
सीबीएसईने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, ज्या विषयांसाठी बाह्य परीक्षकांची नेमणूक केली गेली नाही,
त्या विषयांसाठी संबंधित शाळेतील शिक्षक ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करतील आणि बोर्डाने दिलेल्या लिंकवर गुण अपलोड करतील.

परीक्षा ऑनलाईन पद्धतीने
प्रॅक्टिकल परीक्षा किंवा प्रोजेक्टचे मूल्यांकन करण्यासाठी बाह्य परीक्षकाची नेमणूक केली जाते.
यंदा बाह्य परीक्षक आणि अंतर्गत परीक्षक एकमेकांशी चर्चा करुन प्रोजेक्टसाठीची तारीख निश्चित करतील,
तसेच विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
2021 या वर्षी बारावीच्या परीक्षांबाबत नोंदणीकृत उमेदवारांसाठीचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Also Read This : 

 

Pune Fire News | पुण्यातील पिरंगुट एमआयडीसीमधील सॅनिटायजर तयार करणार्‍या कंपनीला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू

जेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध क्रिकेटर, मॉडलसह सोबत ‘या’ आवस्थेत दिसला होता पीटरसन

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,219 नवीन रुग्ण, तर 21,081 जणांना डिस्चार्ज

सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र कोरोनाच्या मृत्यू संख्येत जगात 10 व्या क्रमांकावर, भाजपची टीका (व्हिडीओ)

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून कुविख्यात बापु नायरच्या टोळीतील सदस्याला अटक, गुन्हेगाराच्या अंत्ययात्रे दरम्यान काढली होती वाहनांची रॅली

मराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार ?