खुशखबर ! केंद्र सरकारच्या नोकरदारांना ‘या’ ठिकाणी तिप्पट सुट मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने दिवाळी गिफ्ट दिल्यानंतर आता पुन्हा एक गिफ्ट दिले आहे. त्यामुळे आता ते टॅक्सचे टेन्शन न घेता गिफ्ट घेऊ शकणार आहेत. यासाठी त्यांची मर्यादा तीनपट वाढवण्यात आली आहे.

अ आणि ब वर्गातील कर्मचारी आता 5,000 रुपयांपर्यंतचे गिफ्ट स्वीकारू शकणार आहेत. मात्र यापुढील किमतीचे गिफ्ट स्वीकारण्यासाठी त्यांना सरकारची परवानगी घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना केवळ 1,500 रुपयांपर्यंतचे गिफ्ट स्वीकारण्याची परवानगी होती. त्याचबरोबर क वर्गातील कर्मचारी हे 500 रुपयांपासून 2,000 रुपयांपर्यंतचे गिफ्ट स्वीकारू शकणार आहेत. त्याचबरोबर विदेशी व्यक्तीकडून 1,000 रुपयांपर्यंतच्या किमतीचे गिफ्ट स्वीकारण्याचा नियम देखील हटवला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहेत हे नियम –
अ वर्गात सरकारी अधिकारी येत असून बी वर्गात गॅजेटेड आणि नॉन-गॅजेटेड अधिकारी येतात. हा नियम हटवण्यामागील कर्मचाऱ्यांना IAS, IPS, IFS यांच्या पातळीवर आणून ठेवणे हा आहे. या नियमांमध्ये तुम्ही जवळचे नातेवाईक, ट्रान्सपोर्ट, बोर्डिंग आणि लॉजिंग यांसारखे गिफ्ट देखील घेऊ शकता. त्याचबरोबर लग्न, वाढदिवस, अंतिम संस्कार आणि धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी सरकारी कर्मचारी आपल्या नातेवाईकांकडून गिफ्ट घेऊ शकतात. मात्र याची रक्कम जास्त असेल तर सरकारला माहिती द्यावी लागणार आहे.

Visit : Policenama.com

You might also like