Aadhaar अन् PAN कार्ड आतापर्यंत नाही केलं लिंक तर ‘नो-टेन्शन’ ! ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर केंद्रानं ‘इतक्या’ दिवसांची मुदत वाढवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारनं आजपर्यंत (31 मार्च 2021) मुदत दिली होती. मात्र, केंद्र सरकारनं कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर ही मुदत वाढवली असून आता आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्यासाठीची मुदत वाढवली आहे. ती आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक केलेली नाही त्यांना दिलासा मिळाला आहे.

31 मार्च 2021 पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास मोठा दंड देखील ठोठावला जाणार होता. मात्र, केंद्र सरकारकडून आता पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत वाढवल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.