केंद्र सरकारने 4 लेबर कोडच्या अतंर्गत कामगार नियमांना दिले अंतिम रूप, लवकर केले जातील लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने चार लेबर कोड (Labour Code) च्या अंतर्गत नियमांना अंतिम रूप दिले आहे. यामुळे कामगार सुधारणांची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की, लवकरच हे लागू करण्यासाठी अधिसूचित केले जाईल. चार कोडच्या अंतर्गत वेतन, इंडस्ट्रीयल रिलेशन्स, सामाजिक सुरक्षा आणि ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन (ओएसएच) ला राष्ट्रपतींची मंजूरी मिळाल्यानंतर अधिसूचित करण्यात आले आहे. मात्र, हे चार कोड लागू करण्यासाठी नियमांना अधिसूचित करण्याची आवश्यक आहे.

राज्यसुद्धा चार कोड अंतर्गत नियम बनवण्यावर करत आहेत काम
कामगार मंत्रालयाने चार कोडच्या मसूदा नियमांवर सल्ला-मसलतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्यांना नोटिफिकेशनसाठी तयार केले आहे. कामगार सचिव अपूर्वा चंद्र यांनी सांगितले की, चार कोड अंतर्गत कामगार नियमांना अंतिम रूप देण्यात आले आहे, जे चार लेबर कोड लागू करण्यासाठी आवश्यक आहे. राज्य चार कोडच्या अंतर्गत नियम बनवण्यासाठी आपले काम करत आहेत. संसदेने चार मुख्य कोडमध्ये वेतन, इंडस्ट्रीयल रिलेशन्स, सामाजिक सुरक्षा आणि ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशनला मंजूर केले होते, ज्यामध्ये 44 केंद्रीय कामगार कायदे पुर्नगठित होतात. वेतनवरील कोड संसदेने 2019 मध्ये पास केला होता, तर अन्य तीन कोड दोन्ही सभागृहांतून 2020 मध्ये मंजूर केले गेले होते.

एकाच वेळी लागू करायचे आहेत चार कोड
केंद्र सरकारला सर्व कोड एकाचवेळी लागू करायचे आहेत. हे नियम बनवल्यानंतर चार कोड एकाचवेळी अधिसूचित केले जाऊ शकतात. अपूर्वा चंद्र यांनी नुकतेच म्हटले होते की, नियम बनवण्याची प्रक्रिया अगोदरपासूनच जारी आहे, जी लवकरच पूर्ण होण्याची आशा आहे. मंत्रालय लवकरच कोड लागू करण्याच्या स्थितीत असेल. सोबतच म्हटले होते की, कामगार समान यादीचा विषय आहे. म्हणून, राज्य सुद्धा काही नियम चार कोडच्या अंतर्गत बनवतील. राज्ये सुद्धा मसूदा नियमांना अधिसूचित करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि ते लागू करण्यासाठी सल्ला-मसलत जारी आहे.