B.Ed, M.Ed. प्रवेशासाठी सीईटी सेलकडून मुदतवाढ

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (CET Cell) बी. एड. आणि एम. एड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याकरिता मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीनुसार बी. एड साठी शुक्रवारी (दि. 25) तर एम. एड साठी बुधवारी (दि. 23) पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

सीईटी सेलकडून यापूर्वी प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार बी. एड. साठी 18 डिसेंबर तर एम. एड साठी 16 डिसेंबर ही तारीख दिली होती. मात्र तांत्रिक समस्यांमुळे काही विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाही. त्यामुळे सीईटीने मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांनी एम. एड. साठी “med.hepravesh.in’ या संकेतस्थळावर तर बी. एड अभ्यासक्रमासाठी bed.hepravesh.in संकेतस्थळावर अर्ज करावा, अशी माहिती सीईटी सेलचे चिंतामणी जोशी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.