Chafekar Bandhu Smarak | पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chafekar Bandhu Smarak | पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारक (Chafekar Bandhu Smarak) पूर्ण करण्यासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

 

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते . बैठकीला खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne), आमदार अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap), पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंग (IAS Shekhar Singh), क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभूणे (Girish Prabhune) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. (Chafekar Bandhu Smarak)

 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.

यावेळी प्रभूणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले.
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखरसिंह यांनी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण केले.

 

Web Title :  Chafekar Bandhu Smarak | CM Eknath Shinde will give 41 crores for the
memorial of revolutionary Chapekar Bandhu in Pimpri Chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme