Chagan Bhujbal | ‘राहुल गांधींनी हा मुद्दा टाळला पाहिजे, त्यांच्यासमोर इतरही प्रश्न आहेत’ – छगन भुजबळ

नाशिक: पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात सध्या मोठे वाद सुरु आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांना आपले मत टाळता आले असते, तर बरे झाले असते. इतिहासात प्रत्येकातच काहीतरी कमी जास्त आढळते, असे छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले आहेत.

अलीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव झाला. त्यात पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे देशासाठी बलिदान आणि त्यांचे नाव आले नाही. पण सावरकरांवरुन जे लोक आता रस्त्यावर आले आहेत, त्यांचे स्वातंत्र्यासाठी काय योगदान होते? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. निवडक सावरकर घेणे, चुकीचे आहे. राहुल गांधींनी असल्या प्रश्नांना आणि लोकांना बगल दिली तरी चालेल. आज आपल्यासमोर इतर महत्त्वाचे प्रश्न आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा आतापर्यंत चांगली चालली होती. गेले अनेक दिवस प्रसार माध्यामांनी त्याची दखल घेतली नाही. पण आता ती यात्रा वादाच्या भोवऱ्यात आल्यावर सर्व वाहिन्या त्याची दखल घेत आहेत. त्यामुळे याचा फायदा राहुल गांधी यांना झाला आहे, असे यावेळी छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले.

जो घडला तो इतिहास होता. या सर्व इतिहासात आता जाण्याने काही फायदा नाही. त्याला काही अर्थ नाही.
देशात महागाई, बेकारी, दडपशाही, वेगवेगळ्या संस्था ताब्यात घेऊन एकतर्फी कारभार होत आहे.
या सगळ्यावर ते बोलत आहेत. त्यांनी दाखविलेल्या पत्रावर बोलायला मी इतिहासकार नाही.
त्या मुद्द्यावर आणि पत्रावर वैचारीक विरोध झाला पाहिजे. सावरकरांच्या देशप्रेमाबद्दल, त्यांच्या तुरुंगवासाबद्दल
माझ्या मनात आदर आहे. सावरकरांनी माफीनामा लिहून दिला, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला की नाही?
ही राजनीती होती की रणनीती होती, याच्यावर इतिहासकारांनी चर्चा करायला हवी.
जे लोक सावरकरांच्या नावाने मोर्चे काढत आहेत, ते सावरकरांचे हिंदुत्व स्वीकारत नाहीत.
सावरकरांचा फक्त राजकारणापुरता उपयोग सुरु आहे, असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले.

Web Title :-  Chagan Bhujbal | chhagan bhujbal reaction on rahul gandhi savarkar statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीला जीवे मारण्याची धमकी, पिंपरी चिंचवडमधील घटना

Rohit Pawar | ‘खरा इतिहास एकदा सर्वांच्या समोर येऊ द्या’ – आ. रोहित पवार

5G Internet | Airtel घेऊन आली पुणेकरांसाठी 5G सेवा; सध्या ‘इथे’ मिळणार 5G नेटवर्क