झाकिर नाईकला मलेशियात बेड्या, आज प्रत्यार्पण होण्याची शक्यता! 

क्वालालंपूरः वृत्तसंस्था-

मनी लॉन्डरिंग आणि दहशदवाद पसरवण्यासाठी पैसा पुरविल्याप्रकरणी भारताला हवा असलेला वादग्रस्त धर्मप्रसारक डाॅ. झाकिर नाईक याला आज (बुधवार) भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलेशिया सरकार नाईकला भारताच्या हवाली करणार आहे. नाईकला भारताच्या ताब्यात देण्याच्या संदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे देखील समजते आहे.
[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8a0238b4-7f76-11e8-a745-b5ceed4b8a8c’]

मागील काही दिवसापासून भारतीय राष्ट्रीय तपास यंत्रणेला नाईक हवा आहे. त्याच्या विरोधात 2017 मध्ये एनआयएने गुन्हा दाखल केला होता. सदरचे वृत्त एका इंग्रजी वाहिनीने मलेशिया पोलिस दलातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. मात्र या बाबतीत  केंद्र सरकार अथवा गृहमंत्रालयाने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही.

बांगलादेशात 2016 मध्ये झालेला दहशदवादी हल्ला झाकीर नाईक याने पीसी टीव्हीवर दिलेल्या भाषणामुळे झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या भिषण हल्यात एका भारतीय मुलीसह 22 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर सरकारने नाईकची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर बंदी घातली होती.
[amazon_link asins=’B07944CZ7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90509a63-7f76-11e8-8323-c541d2f96df2′]

तर झाकिर नाईक काय म्हणतोः

मी भारतामध्ये परत येणाचे वृत्त तथ्थहिन आणि चुकीचे आहे. जोपर्यत भारत मला सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत माझ्याकडे परत येण्याचा कोणताही विचार नाही. जेव्हा भारतात तटस्थ आणि निःपक्षपाती सरकार असेल तेव्हा मी परत येईल.

तर NIAने देखील या वृत्तावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात झाकिर नाईकला भारताच्या ताब्यात देण्यासंदर्भात आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही.आम्ही या वृत्ताची सत्यता तपासत आहोत, असे एनआयएचे प्रवक्ते अलोक मित्तल यांनी म्हटले आहे.