बजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा, नीरज बजाज नवे अध्यक्ष

पोलीसनामा ऑनलाइन – नामाकिंत बजाज ऑटो (Bajaj Auto) कंपनीचे कार्यकारी संचालक तथा अध्यक्ष राहुल बजाज यांनी आज राजीनामा दिला आहे. राहुल बजाज यांनी अध्यक्ष पदाचा पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा बजाज ऑटो कंपनीने केलीय. या अध्यक्ष पदावर आता कंपनीचे कार्यकारी संचालक नीरज बजाज यांची वर्णी लागली आहे. नीरज बजाज हे आता १ पासून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

बजाज ऑटो कंपनीबरोबर राहुल बजाज हे १९७२ या सालापासून सर्वकाळ कार्यरत होते. राहूल बजाज हे गेली ५ दशकांहून अधिक काळ बजाज ऑटो कंपनीबरोबर कार्य केले आहे. आता त्यांचं वय झाला आहे. म्हणून वयाचा विचार करता त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याचं बजाज ऑटो कंपनीने म्हटले आहे. ३० एप्रिल हा त्यांचा कामाचा शेवट असेल.

या दरम्यान, राहुल बजाज यांचे कंपनीमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी आहे. राजीनामा दिल्यामुळे ३० एप्रिल हा त्यांचा कामाचा अखेरचा दिवस असणार आहे. त्यांचा दीर्घकाळचा जास्त अनुभव आणि त्यांची कंपनीशी असणारी कार्य संबध आणि बांधिलकी यावरून राहुल बजाज हे कंपनीशी कायम जोडलेले राहतील. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि शिकवणुकीचा फायदा यापुढेही कंपनीला होत राहील. ते सल्लागार म्हणून सदैव कंपनीच्या बरोबर असणार आहेत. असे कंपनीने म्हटले आहे.