Chanakya Niti : ‘या’ 3 गोष्टींमुळे व्यक्तीला मिळू शकत नाही यश, जाणून घ्या चाणक्य नीती

पोलीसनामा ऑनलाइन  : Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्यानुसार जीवनात यश त्याच व्यक्तीला मिळते, जो चुकीच्या सवयींपासून कायम दूर राहतो. चाणक्य नीती सांगते की, चुकीच्या सवयी व्यक्तीच्या प्रतिभेचा नाश करतात. प्रतिभाशाली व्यक्ती कितीही योग्य असली तरी त्याच्यात चुकीच्या सवयी असतील तर त्याच्या हाती निराशा लागेल. यासाठी वेळीच सावरले पाहिजे. चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला या सवयींपासून दूर राहीले पाहिजे.

खोटे बोलण्याने मिळते अपयश
चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल तर खरे बोलण्याची सवय लावून घेतली पाहिजे. खोटे बोलून काही वेळासाठी लाभ मिळू शकतो, परंतु जेव्हा खोट्यावरील पडदा दूर होईल, तेव्हा लज्जित होण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

धन आणि पदाचा अहंकार करू नका
चाणक्य यांच्यानुसार अहंकार व्यक्तीचा नाश करतो. अहंकार कधीही करू नये. जो व्यक्ती आपले पद आणि पैसा यांचे प्रदर्शन करतो आणि दुसर्‍यांवर याचा रूबाब दाखवतो, अशा लोकांकडे समाजात कधीही सन्मानाने पाहिले जात नाही. चाणक्य यांच्यानुसार अहंकाराची सवय व्यक्तीचे पतन करते. अहंकार व्यक्तीला यशापासून दूर नेते.

बढाया मारणे चुकीची सवय
चाणक्यांची चाणक्य नीती सांगते की, जी व्यक्ती अनावश्यक गोष्टींना वाढवून-चढवून सांगते त्या व्यक्तीपासून दूर राहीले पाहिजे. कारण अशा व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतात. चाणक्यांनुसार व्यक्तीला बढाया मारण्याच्या सवयीपासून दूर राहीले पाहिजे. कारण समाज अशा व्यक्तींना गांभिर्याने घेत नाही.