१४९ वर्षानंतर लागणार वर्षातील दुसरं ‘चंद्रग्रहण’, ही काळजी अवश्य घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सुर्यग्रहणानंतर आता १६ जुलैला वर्षांतील दुसरे चंद्रग्रहण सुरु होणार आहे. यंदा हे चंद्रग्रहण गुरु पौर्णिमेच्या दिवशी १६ जुलैला लागेल. असा अनोखा योग १४९ वर्षांनी पुन्हा येत आहे. या आधी १८७० मध्ये असा दुर्मिळ योग आला होता. विशेष म्हणजे यंदा हे चंद्रग्रहण भारतात देखील पहायला मिळणार आहे. हे चंद्रग्रहण साधारण ३ तास तरी असेल. १६ जुलैला जवळपास रात्री १.३० वाजता ग्रहण सुरु होईल. हे ग्रहण १७ जुलैला सकाळी ४.३० वाजता संपेल.

हिंदू धर्मात ग्रहणाला अत्यंत महत्व दिले जाते. हिंदू पंचागानुसार चंद्रग्रहण आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या नक्षत्रात लागते. हे चंद्रग्रहण खंडग्रास चंद्र ग्रहण असेल. ग्रहणासंबंधित अनेक परंपरा प्रचलित आहेत.

ग्रहणासंबंधित काही प्रचलित परंपरा –

१. ग्रहणादरम्यान अन्न आणि पाणी पिऊ नये.

२. चंद्र ग्रहण असताना अंघोळ करु नये, ग्रहण संपल्यावरच अंघोळ करावी.

३. ग्रहणाला कधीही उघड्या डोळ्याने पाहू नये, यामुळे डोळ्यावर वाईट परिणाम होतो.

४. ग्रहणादरम्यान मंत्राचा जप केला गेला पाहिजे.

ग्रहणाचा लाभ मिळवण्यासाठी उपाय –

१. घरात कोणी अधिक काळापासून आजारी असेल तर ग्रहणानंतर तूप आणि खीर याचे हवन करुन तुम्ही लाभ मिळवू शकतात.

२. चंद्रमा कमजोर स्थितीत असेल तर ‘ऊं चंद्राय नम:’ असा जप करावा.

३. ग्रहणादरम्यान प्राणायम आणि व्यायाम करावा, विचारांना सकारात्मक ठेवावे.

४. चंद्रगहण संपल्यावर घरात शुद्धतेसाठी गंगाजल शिंपडावे.

५. अंघोळीनंतर देवाच्या मूर्तीला स्नान घालून त्यांची पूजा करावी.

६. ब्राम्हणांना अन्न दान करावे.

आरोग्यविषयक वृत्त

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या